घरदेश-विदेशकेरळमध्ये मुसळधार पावसाचे ८७ बळी

केरळमध्ये मुसळधार पावसाचे ८७ बळी

Subscribe

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे आत्तापर्यंत ८७ बळी गेले आहेत. पावसामुळे केरळमधील जनजीवन पूर्णता विस्कळाीत झाले आहे.

केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून आत्तापर्यंत ८७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सकाळी पलक्कड जिल्ह्यामध्ये झालेल्या भूसख्खलनामुळे ७ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे जनजीवन देखील पूर्णता विस्कळीत झाले आहे. लष्कर, नेव्ही, NDRF आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सध्या बचावकार्य सुरू आहे. राज्यातील ३५ धरणे फुल्ल झाले असून धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी, नदीकाठच्या गावांना अधिक सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण राज्यभरात रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. लाखोंच्या संख्येनं लोकांवर सध्या बेघर होण्याची वेळ ओढावली आहे. तर काही ठिकाणी पर्यटक देखील अडकून पडले आहेत. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेतली जात आहे. विमानसेवेवर देखील मुसळधार पावसामुळे परिणाम झाला असून कोची विमानतळ शनिवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

१.५ लाख लोक रिलीफ कॅम्पमध्ये

मुसळधार पावसामुळे केरळातील जनजीवन पूर्णता विस्कळीत झाले आहे. आत्तापर्यंत १.५ लाख लोक रिलीफ कॅम्पमध्ये राहत आहेत. शिवाय, रस्ता आणि हवाई वाहतूक देखील विस्कळीत झाल्याने मदतकार्यामध्ये अडथळे येत आहेत. बागायती शेतीचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. कोची मेट्रो, तिरूअनंतपुरम ते कन्याकुमारी दरम्यानची रेल्वे सेवा देखील पूर्णपणे ठप्प झाली आहे. राज्यातील ३९ धरणांपैकी ३५ धरणांचे दरवाजे हे पहिल्यांदाच उघडण्यात आले आहेत. दरम्यान, हवामान विभागाने आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बचावकार्य राबवले जात आहे. राज्यामध्ये सुरू असलेला पाऊस हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक मुसळधार पाऊस ठरला आहे.

- Advertisement -
वाचा – केरळमध्ये पूरस्थिती; कोची विमानतळ शनिवारपर्यंत बंद!!

मदतकार्य सुरू

केरळमध्ये सध्या मदतकार्य जोरात सुरू आहे. अडथळ्यांचा सामना करत लष्कर, नेव्ही, हवाई दल आणि NDRF बचावकार्य करत आहे. पण आम्हाला अजून मदत हवी असे साकडे केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला घातले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -