तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस, तर उत्तर भारतात बर्फवृष्टी

पश्चिमेकडे वातावरणात बदल झाले आहेत आन त्याचा परिणाम उत्तर भारतातील हवामानावर होत आहे.

weather alert in next 48 hours heavy rain warning for konkan, pune, central maharashtra

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे तामिळनाडू आणि लगतच्या राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. हवामान खात्याने चेन्नईसह काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे तामिळनाडूतील तीन जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 1 नोव्हेंबरला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या मते, चेन्नईमध्ये आज साडेतीन इंच पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मागील 72 वर्षात तिसऱ्यांदा एवढा पाऊस पडला आहे.

IMD च्या अतिवृष्टीचा इशारा पाहता नागापट्टिनम, मायिलादुथुराई आणि तिरुवरूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये आज बंद ठेवण्यात आले. चेन्नई हवामान खात्यानुसार, आज मुसळधार पावसासह ढगाळ वातावरण होते. चेन्नईच्या अनेक भागात आज मुसळधार पाऊस झाला.

खाजगी हवामान एजन्सी स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत चक्री चक्रीवादळाची परिस्थिती कायम आहे.

हे ही वाचा –  जालन्यातील औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपनीत भीषण स्फोट; दोघांचा मृत्यू तर चार जखमी

उत्तर भारतातील हवामानावर परिणाम
पश्चिमेकडे वातावरणात बदल झाले आहेत आन त्याचा परिणाम उत्तर भारतातील हवामानावर होत आहे. दरम्यान उत्तर भारतातील वातावरण बदलाची परिस्थिती 4 नोव्हेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये तयार होण्याची शक्यता आहे. त्याचाच प्रभावा म्हणून उत्तर भारतात पाऊस, बर्फवृष्टी आणि थंडी पडू शकते.

केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये ईशान्य मान्सून सक्रिय 
ईशान्य मान्सून किनारी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मागील २४ तासांपासून सक्रिय आहे. परिणामी, किनारी आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपापाचा पाऊस पडला. काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

बर्फवृष्टीसह पावसाची शक्यता
जम्मू-काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी झाली. पुढील 24 तासांत किनारपट्टीच्या भागात म्हणजेच आंध्र प्रदेश आणि तटीय तमिळनाडूमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख, जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये एक – दोन ठिकाणी हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. उत्तराखंडमध्येही हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते.

हे ही वाचा –  महाराष्ट्रात थंडीची चाहुल तर दक्षिण भारतात पावसाळी वातावरण; हवामान खात्याची माहिती