नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर आणि भूस्खलनासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचलमध्ये बियास नदीला उधाण आले आहे. शिमल्यातील समरहिल भागातील शिव मंदिरात मोठी दुर्घटना घडली. दोन्ही राज्यांतील अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाले आहे.(Heavy Rain Rain wreaks havoc in Uttarakhand Himachal Pradesh So far 29 people have died)
हिमाचल प्रदेशात 24 तासांपेक्षा कमी कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे एका मोठ्या दुर्घटनेत सात लोक अचानक आलेल्या पुरात वाहून गेले. मंडी जिल्ह्यातील संबल गावातील एक व्हिडिओ क्लिप शेअर करताना मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू म्हणाले की, भयानक परिस्थिती, हाताळण्यासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. डोंगराळ राज्यात गेल्या दोन दिवसांत संततधार पावसामुळे 29 जणांचा मृत्यू झाला आहे.
पुढील काही दिवस बरसणार मुसळधार पाऊस
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑगस्टपर्यंत उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस बरसणार आहे. हवामान विभागाने देहरादून, पौडी, टिहरी, नैनीताल, यूएसनगर आणि चंपावत जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवस मुसळधार पाऊस बरसणार असल्याची अंदाज व्यक्त केला असून, यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.
हेही वाचा : चंद्राच्या जवळ पोहोचले चांद्रयान-3 ; 17 ऑगस्टला घेणार मोठी झेप
शिव मंदिरावर कोसळला डोंगर
बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळी शिमल्याच्या समरहिल परिसरात असलेल्या शिव मंदिरावर भुस्खलनामुळे मोठा डोंगर कोसळला. ज्यामध्ये 15 हून अधिक भाविक गाडले गेल्याची भीती आहे. त्याचवेळी मंदिरातून 9 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुखू यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम बचाव कार्यात गुंतली आहे.
हेही वाचा : Independence Day : स्वातंत्र्यदिनी 954 पोलिसांना पोलीस पदकांनी गौरविणार; महाराष्ट्राला किती पदके?
अचानक आलेल्या पुरात वाहून गेले सात जण
हिमाचल प्रदेशमधील मंडई जिल्ह्यातील संभळ आणि पांडोह येथून अचानक आलेल्या पुरात सात जण वाहून गेल्याचे घटना समोर आली आहे. बचाव आणि मदत पथक सक्रियपणे काम करत आहे. मुख्यमंत्र्यांनी शेअर केल्या व्हिडिओमध्ये, पाणी वेगाने खाली वाहत असल्याचे दिसत आहे आणि कॅमेऱ्याच्या मागे असलेला माणूस वारंवार “हे भगवंता असे म्हणताना ऐकू येत आहे.
Disturbing visuals have emerged from Sambhal, Pandoh – District Mandi, where, as reported, seven individuals have been swept away by flash floods today.
Active rescue, search, and relief operations are currently in progress to address this dreadful situation. pic.twitter.com/OLgZGgXNlF
— Sukhvinder Singh Sukhu (@SukhuSukhvinder) August 14, 2023
मंडी जिल्ह्यात 13 जणांचा मृत्यू
नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या मंडी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर सोलन जिल्ह्यात 7 मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात पूरस्थिती कायम आहे. पुरात सलूनमधील गोठा आणि दोन घरे वाहून गेली. सोलन जिल्ह्यातील कांदाघाट उपविभागातील दोन गावात ढगफुटीमुळे अचानक पूर आला होता.