Delhi Heavy Rain: दिल्लीत मुसळधार पावसामुळे दोन जणांचा मृत्यू; जनजीवनही विस्कळीत

राजधानी दिल्लीत (Delhi) सोमवारी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) सखल भागात गुडघाभर पाणी साचल्याने जनजीवनही विस्कळीत झाले.

राजधानी दिल्लीत (Delhi) सोमवारी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) सखल भागात गुडघाभर पाणी साचल्याने जनजीवनही विस्कळीत झाले. तसेच, दोन जणांना आपला जीव गमवावा लागला असून, अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित (Electricity Supply cut) झाला आहे. कमल (50) असे मृत व्यक्तीचे नाव असून जामा मशीद परिसरात त्यांचा मृत्यू झाला.

कमल आपल्या घराच्या गच्चीत फिरत होते. त्यावेळी जोराच्या वाऱ्यामुळे त्यांच्या घराच्या छताचा काहीसा भाग अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले आणि यामध्येच त्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच, उत्तर दिल्लीतील अंगूरी बाग भागात वादळामुळे पिंपळाचे झाड (Tree) अंगावर पडून बसीर बाबा नावाच्या 65 वर्षीय बेघर व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीत वादळ आणि मुसळधार पावसामुळे जामा मशिदीच्या घुमटाचेही नुकसान झाले आहे. मिळालेल्याम माहितीनुसार, एका मिनारातून आणि मशिदीच्या इतर भागातून दगड पडल्याने दोन जण जखमी झाले आहे. मुख्य घुमटाचा कलश तुटला असून अधिक नुकसान टाळण्यासाठी दुरुस्ती करणे आवश्यक आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या मदतीने मशिदीची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहीणार असल्याचे समजते.

दिल्लीत झालेल्या मान्सून पूर्व मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे बहुतांश वाहनचालकांना तासंतास गाडीमध्येच अडकून राहावे लागले. या वादळामुळे दिल्लीत 294 झाडे पडल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

मुसळधार पावसामुळे दिल्लीकरांचे नुकसान झाले असले तरी, हवामानात झालेल्या बदलामुळे अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या दिल्लीच्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र त्यानंतर वादळी वारे आणि पावसामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झालं.


हेही वाचा – पेट्रोल पंप डिलर्सचा ‘नो-पर्चेस डे; पेट्रोल पंपावर मात्र इंधन विक्री सुरू