घरताज्या घडामोडीमुसळधार पावसामुळे सिक्कीममध्ये भूस्खलन; जवळपास 550 पर्यटक अडकले

मुसळधार पावसामुळे सिक्कीममध्ये भूस्खलन; जवळपास 550 पर्यटक अडकले

Subscribe

देशाच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसाचा फटका सिक्कीमला बसला आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 550 पर्यटक अडकले आहेत.

देशाच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसाचा फटका सिक्कीमला बसला आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 550 पर्यटक अडकले आहेत. पर्यटक अडकल्याची माहिती मिळताच घटनास्थळी स्ट्रायकिंग लायन डिव्हिजनच्या तुकड्यांकडून त्यांना मदत केली जात आहे. (Heavy Rainfall In Sikkim Tourists Stranded Landslide Provided Medical Aid Food)

सिक्कीममध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे राजधानी गंगटोक आणि त्याच्या लगतच्या भागातील पाणीपुरवठ्यावर खंडीत झाला आहे. तसेच उत्तर सिक्कीम जिल्ह्यातील विविध ठिकाणी रस्ता खराब झाल्याने पर्यटक अडकले आहेत. त्यामुळे जवळपास 550 पर्यटक अडकले.

- Advertisement -

या पर्यटकांची माहिती मिळताच घटनास्थळी स्ट्रायकिंग लायन डिव्हिजनच्या तुकड्यांकडून मदत केली जात आहे. पर्यटकांना जेवन,पाणी पुरवण्यात येत असून, ज्या पर्यटकांची प्रकृती ठीक नाही अशा पर्यटकांपर्यंत औषधे पोहोचवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिक्कीममधील हवामान अद्यापही खराबच आहे. अडकलेल्या पर्यटकांना सातत्याने सुरक्षेबाबत माहिती दिली जात आहे. राज्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या हिमालयीन राज्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘महाराष्ट्राला शिवसेना व ठाकरेंशिवाय पर्याय नाही’; ऋतुजा लटकेंचा शिंदे गट-भाजपाला टोला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -