घरदेश-विदेशउत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत पावसाचे रौद्र रूप; पुरामुळे 13 जणांचा मृत्यू

उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत पावसाचे रौद्र रूप; पुरामुळे 13 जणांचा मृत्यू

Subscribe

नवी दिल्ली : राज्यात अद्याप पावसाने जोर धरलेला नसताना उत्तर भारतात पावसाने रौद्र रूप धारण केल्याचे पाहायला मिळत आहे. मागील 2 दिवासंपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले असून आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर फक्त उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) वेगवेगळ्या घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यात्रेकरूंनी भरलेली एसयूव्ही गंगेत पडल्याने सहा जणांचा मृत्यू झाला, तर काही अजूनही बेपत्ता असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि दिल्लीमध्येही (Delhi) मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Heavy rainfall over Uttarakhand, Himachal Pradesh and Delhi; 13 people died due to flood)

दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मिरसह 12 राज्यांमधये पुढील 5 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पाऊस, भूस्खलन आणि रस्ते अडवण्याच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने इतर राज्यांतून येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घातली आहे. तसेच राज्यातील 195 रस्ते बंद करण्यात आले आहेत. याशिवाय नैनितालच्या जिल्हा प्रशासनाने १३ जुलैपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भारतात घुसखोरांच्या संख्येत वाढ? सीमा हैदरच्या घटनेमुळे प्रश्न ऐरणीवर

हिमाचल प्रदेशात गेल्या 36 तासांत 13 भूस्खलन आणि नऊ पूर आले आहेत, ज्यामध्ये पाच लोकांचा मृत्यू झाला आहे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गासह एकूण 736 रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच पुढील दोन दिवस शाळा आणि महाविद्यालयेही बंद ठेवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. पावसाचे अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी पांडोह धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यानंतर बियास नदी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहे.

- Advertisement -

राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या माहितीनुसार, मुसळधार पावसाने मंडी, कुल्लू आणि लाहौल आणि स्पिती जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मनालीजवळील बहंग येथे अचानक आलेल्या पुरात अनेक दुकाने वाहून गेली, तर कुल्लू येथील पाटलीकुहलजवळ बियास पुरात एक बांधकाम सुरू असलेले घर बुडाले आहे.

हेही वाचा – National Pension Scheme : गुंतवणुकीचा धोका कमी, खासगी नोकरदारांनाही मिळणार पेन्शन

रावी, बियास आणि सतलजसह सर्व प्रमुख नद्यांना पूर आला असून पर्यटकांना मुसळधार पावसात प्रवास टाळण्यास आणि नदीच्या पात्राजवळ न जाण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, मोहाली जिल्ह्यातील पुराचा सामना करण्यासाठी पंजाब सरकारने लष्कराची मदत मागितली आहे. रविवारी दिल्लीत गेल्या 41 वर्षांतील जुलैमध्ये एका दिवसात सर्वाधिक 153 मिमी पाऊस झाला. राष्ट्रीय राजधानीत गेल्या वेळी 25 जुलै 1982 रोजी इतका पाऊस झाला होता. दरम्यान, आजपासून पावसाची तीव्रता कमी होणार असे हवामान विभागाने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -