घरदेश-विदेशIMD Monsoon 2021 : १० जूनपर्यंत 'या' राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस, IMD...

IMD Monsoon 2021 : १० जूनपर्यंत ‘या’ राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा

Subscribe

ईशान्य, पूर्व राज्यांमध्ये पावसाचा अंदाज 

मुंबई, महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये सध्या रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. यातच विविध भागांमध्ये पडत असणाऱ्या पावसामुळे राजधानी दिल्लीतही येत्या काही तासांत हलके आणि मध्यम हवामान राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यातच दिल्लीतील उत्तर, पश्चिम भागांसह नवी दिल्लीतील नरेला भाग, पश्चिम विहार, पंजाबी बाग, राजौरी गार्डन, पटेल नगर, दिल्ली विद्यापीठ, सिव्हिल लाईन्स, काश्मिरी गेट भागांत हलका आणि मध्यम स्वरुपाचा रिमझिम पाऊस बरसणार आहे.

देशांत मान्सूनचा जोर वाढणार 

तर रविवारपासून अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, बंगालचा उपसागर, आणि संपूर्ण उत्तर-पूर्व राज्यांमध्ये ( नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश) मान्सूनचा वेग वाढत असल्याचेही IMD ने स्पष्ट केले.

- Advertisement -

ईशान्य, पूर्व राज्यांमध्ये पावसाचा अंदाज 

ईशान्यकडून वाहणाऱ्या वेगवाग वाऱ्यांमुळे आणि पश्चिम बंगालमधील चक्रीवादळामुळे येत्या ४ ते ५ दिवसांत ईशान्येकडील राज्य आणि पूर्वकडील राज्यांमध्ये सर्वत्र पावसाचा अंदाज IMD ने वर्तवला आहे.

‘या’ राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस 

यात अरुणाचल प्रदेश राज्यात ६ ते ७ जूनदरम्यान मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तर आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, सिक्किम राज्यांत ८ ते ९ जूनदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याचबरोबर नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा राज्यात ६ ते ७ जून, ओडिशामध्ये ८ ते ९ जून आणि पश्चिम बंगालमध्ये १० जूनदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

- Advertisement -

अनेक भागांत सक्रिय होतोय मान्सून 

केरळमध्ये दोन दिवस उशीरा जरी मान्सून दाखल झाला असला तरी तीन दिवसांत मान्सूनने केरळसह, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्ये व्यापून टाकली. तर ३ ते १० जूनदरम्यान मान्सून ईशान्येकडील सर्व भाग व्यापणार आहे. उदा, अगरतला, आयझवळ, शिलाँग, इम्फाल भागांत १ जूनदरम्यान मान्सूनचे आगमन होते तर सिक्कीममधील गंगाटेक भागांत १० जूनपर्यंत मान्सून पोहचतो. दरम्यान ७ ते ८ जूनदरम्यान देशांत पावसाचा जोर कमी असणार असल्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे.


Covishield vs Covaxin: कोविशिल्ड लसीमध्ये सर्वाधिक अँटीबॉडी, भारतातील संशोधनातून बाब उघड

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -