घरदेश-विदेशHemant Soren Arrest: अटकेविरोधात हेमंत सोरेन यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; काय दावा...

Hemant Soren Arrest: अटकेविरोधात हेमंत सोरेन यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; काय दावा केला?

Subscribe

झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि JMM नेते हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Hemant Soren Arrest: झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि JMM नेते हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांना बुधवारी (31 जानेवारी) ईडीने अटक केली. हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर शुक्रवारी (2 फेब्रुवारी) सुनावणी होणार आहे. हेमंत सोरेन यांच्या अटकेचा मुद्दा ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला. (Hemant Soren Arrest Hemant Soren moves Supreme Court against arrest What did you claim)

सॉलिसिटर जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, सोरेन यांनीही उच्च न्यायालयात अशीच याचिका दाखल केली होती. यानंतर सिब्बल म्हणाले की, सोरेन उच्च न्यायालयातून याचिका मागे घेतील. सिब्बल यांच्यासोबत ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी हेही सरन्यायाधीशांसमोर प्रकरण मांडण्यासाठी आले होते.

- Advertisement -

काय म्हणाले कपिल सिब्बल?

सिब्बल यांनी अटकेवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, अटक मेमोमध्ये त्यांना 10 वाजता अटक करण्यात आल्याचे म्हटले आहे आणि ते म्हणत आहेत की त्यांना 5 वाजता अटक करण्यात आली. ही अत्यंत गंभीर बाब आहे.

यावर ईडीचे वकील सॉलिसिटर जनरल म्हणाले की, त्याच्यावर (हेमंत सोरेन) खूप गंभीर आरोप आहेत. यानंतर कपिल सिब्बल म्हणाले की निवडणुकीपूर्वी अटक करत राहणार का?

- Advertisement -

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

सुमारे सात तासांच्या चौकशीनंतर ईडीने बुधवारी सोरेन यांना अटक केली होती. ईडीच्या कोठडीत सोरेन यांनी राजभवन गाठले आणि मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. दरम्यान, हेमंत सोरेन यांच्या जवळचे नेते चंपाई सोरेन यांनी आमदारांसह राजभवन गाठले आणि सरकार स्थापनेचा दावा केला. ते म्हणाले की, आम्हाला 47 आमदारांचा पाठिंबा आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी हेमंत सोरेन यांचा राजीनामा स्वीकारला आहे. मात्र, चंपाई सोरेन यांचा शपथविधी कधी होणार याबाबत साशंकता आहे.

(हेही वाचा: Budget 2024 : सत्ताधाऱ्यांसाठी आशादायी तर विरोधकांना नावीन्य नसलेला वाटतोय अर्थसंकल्प )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -