घरदेश-विदेशHemant Soren Arrest: हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंड बंद; याचिकेवर आज हायकोर्टात...

Hemant Soren Arrest: हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंड बंद; याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी

Subscribe

हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर चंपाई यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे.

रांची: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर आता झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन यांच्या शपथविधीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. JMM ने चंपाई सोरेन यांना राज्याचा पुढील मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला आहे. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर चंपाई यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्यांनी 43 आमदारांच्या पाठिंब्याची पत्रेही राज्यपालांना सुपूर्द केली आहेत. (Hemant Soren Arrest Jharkhand shutdown after Hemant Soren s arrest Hearing on the petition today in the High Court)

हेमंत सोरेन यांना ईडीने जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. तत्पूर्वी, राजभवनात पोहोचल्यानंतर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, जो राज्यपालांनी स्वीकारला होता. याआधी मंगळवारी हेमंत सोरेन हे ईडीने समन्स बजावल्यानंतर गायब होते ते 40 तासांनंतर अचानक दिल्लीहून रांचीला पोहोचले. सोरेन यांनी दिल्ली ते रांची असा 1250 किमीचा प्रवास केला. येथे त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या वरिष्ठ नेत्यांची आणि सहयोगी आमदारांची भेट घेतली. या बैठकीला सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेनही उपस्थित होत्या.

- Advertisement -

(हेही वाचा: POLICE : नवी मुंबई पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी; गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी वाढली गुन्ह्यांची उकल )

‘झारखंड झुकणार नाही’- अखिलेश यादव

हेमंत सोरेनच्या अटकेवर यूपीचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, झारखंडमध्ये भाजपचा आदिवासीविरोधी चेहरा समोर येत आहे. हा झारखंडच्या जनमताचा अपमान आहे. त्यामुळे झारखंडमधील प्रत्येक रहिवासी यावेळी भाजपच्या विरोधात मतदान करेल आणि भाजपला ऐतिहासिक पराभवाला सामोरे जावे लागणार आहे.

- Advertisement -

मी शिबू सोरेन यांचा मुलगा आहे- मुख्यमंत्री हेमंत सोरेन

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा अटकेपूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात ते म्हणत आहेत, “ईडी आज मला अटक करू शकते, पण मी घाबरत नाही कारण मी शिबू सोरेनचा मुलगा आहे. मला एका प्रकरणात अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याचा माझ्याशी संबंध नाही. त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. माझ्या दिल्लीतील निवासस्थानावर छापे टाकून त्यांनी माझी प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -