घरदेश-विदेशHemant Soren : अखेर 40 तासांनंतर हेमंत सोरेन प्रकटले; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी...

Hemant Soren : अखेर 40 तासांनंतर हेमंत सोरेन प्रकटले; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी होणार चौकशी

Subscribe

झारखंड : झारखंडमध्ये ईडीने तपास सुरू केल्यापासून राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. याचदरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता झाल्याचा दावा भाजपाने केला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष भाजपा आणि सत्ताधारी झामुमो यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. अशातच आता हेमंत सोरेने 40 तासांनंतर प्रकटले आहेत. कथित जमीन घोटाळ्यासंबंधी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून तपास केला जात आहे. (Finally after 40 hours Hemant Soren appeared An inquiry will be held in the case of money laundering)

हेही वाचा – Maratha Reservation Survey : मराठा सर्वेक्षणासाठी शिक्षकांऐवजी विद्यार्थीच दिमतीला

- Advertisement -

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अडचणीत आले आहेत. सोमवारी सकाळी 7 वाजता ईडीने दिल्लीतील शांती निकेतनमधील हेमंत सोरेन यांच्या घरासह 3 ठिकाणी छापे  टाकले आणि रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. ईडीच्या टीमला मुख्यमंत्री हेमंत सोरेन सोमवारी सापडले नाहीत. मात्र आता ते 40 तासानंतर समोर आले आहेत. त्यामुळे आता त्यांना अटक होणार का? हे पाहावे लागेल. कारण ईडीने आतापर्यंत त्यांना 10 समन्स जारी केले आहेत.

- Advertisement -

हेमंत सोरेन 27 जानेवारी रोजी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले होते. त्यांनी चार्टर फ्लाइटने उड्डाण केले. तसेच दिल्लीत काही राजकीय बैठका घेण्यासाठी ते गेल्याचे सांगण्यात आले. यानंतर भाजपाने मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता झाल्याचा दावा केला होता. तसेच इंस्टाग्रामवर हेमंत सोरेन यांच्या फोटोसह एक पोस्टर शेअर केले होते. त्यात लिहिले की, ‘नाव- हेमंत सोरेन. गडद रंग, उंची 5 फूट 2 इंच, कपडे- पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि पायात चप्पल. 29 जानेवारी रात्री 2 वाजल्यापासून म्हणजे गेल्या 40 तासांपासून ते बेपत्ता आहेत. त्यांना रात्री 2 वाजता पायी बाहेर पडताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शेवटचं पाहिले होते. ज्या मान्यवरांना याबाबत माहिती मिळेल त्यांनी त्वरित दिलेल्या पत्त्यावर कळवावे. माहिती देणाऱ्यास 11 हजार रुपये रोख दिले जाईल, अशी घोषणा भाजपाने केली होती.

हेही वाचा – Bihar Politics : मुख्यमंत्री नितीश कुमारांना ‘शह’ देण्यासाठी इंडिया आघाडीची रणनीती; असा आहे प्लॅन

दरम्यान, भाजपाच्या या पोस्टरवर बोलताना झामुमोचे प्रवक्ते मनोज पांडे यांनी सांगितले की, हेमंत सोरेन पळून गेलेले नाही आहेत. ते लवकरच आमच्याकडे परतील. मात्र ते कुठे आहेत हे आम्ही सांगू शकत नाही. ही आमची रणनीती आहे. खरं तर निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना त्रास दिला जात आहे, असा आरोप करतानाच मनोज पांडे म्हणाले की, कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या ईडीच्या तपासापूर्वी झारखंड मुक्ती मोर्चाने आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महाआघाडी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -