घरदेश-विदेशHemant Soren : हेमंत सोरेन नितीश कुमारांसारखे पलटूराम नाहीत - संजय राऊत

Hemant Soren : हेमंत सोरेन नितीश कुमारांसारखे पलटूराम नाहीत – संजय राऊत

Subscribe

ईव्हीएम बनविणार भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी आहे. अत्यंत गुप्त पद्धतीने तेथे काम केले जाते. तिथे आतापर्यंत कधीही राजकीय हस्तक्षेप नव्हता. त्या कंपनीच्या संचालक पदी भाजपाचे पदाधिकारी असलेले चार संचालक तेथे प्रथम नेमण्यात आले आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

मुंबई : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अडचणीत आले आहेत. हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल हे नितीश कुमार यांच्यासारखे पलटूराम नाही. त्यामुळे त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा केला आहे. इंडिया ही हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांच्यासोबत उभा आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. ईव्हीएम बनविणार भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या संचालक पदी भाजपाचे चार पदाधिकारी नेमण्यात आली आहे, अशी माहितीही संजय राऊत यांनी आज मध्यमांशी बोलताना दिली आहे.

हेमंत सोरेनबाबत संजय राऊत म्हणाले, “हेमंत सोरेन यांच्याकडे बहुमत आहे. लोकांनी हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना लोकांनी निवडून दिलेले मुख्यमंत्री आहेत. देशाील तपास यंत्रणाला हे भाजपाचे गुलाम झाले आहेत. हे देशाचे लोकशाही नाही. हे हुकूशाहीपेक्षाही मोठे राजकारण सुरू आहे. तुम्ही काल चंदीगडमध्ये पाहिले असेल, हे तुमची लोकशाही आहे की, 8 मते बाद केली. कारण तुम्हाला भाजपाच्या महपौराला निवडून आण्याचे आहे म्हणजे येथे लोकशाही रुपी पवित्र सीतेचे राम भक्तांनी अपहरण केले आहे. आम्ही लोकशाहीला पवित्र सीतेचा दर्जा देत आहोत. रामायणात सीतेचे अपहरण केले आहेत. पण स्वत:ला रामभक्त म्हणणारे लोकांनी सीतेचे अपहरण केले आहे. आम्ही काल चंदीगडमध्ये सीताचे अपहरण पाहिले आहे. महाराष्ट्रात देखील दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. हेमंत सोरेन हे वाकायला तयार नाहीत. नितीश कुमार यांच्यासारखे पलटीमारायला तयार नाही. अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन हे पलटूराम होण्यास तयार नाहीत. त्याची किंमत दे लोक देत आहेत. या दोघांसोबत इंडिया आघाडी आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – PM Narendra Modi : गोंधळ घालणाऱ्यांसाठी अधिवेशन म्हणजे पश्चाताप व्यक्त करण्याची संधी; मोदींचा टोला

ईव्हीएम संजय राऊत म्हणाले, “ईव्हीएम बनविणार भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी आहे. अत्यंत गुप्त पद्धतीने तेथे काम केले जाते. तिथे आतापर्यंत कधीही राजकीय हस्तक्षेप नव्हता. त्या कंपनीच्या संचालक पदी भाजपाचे पदाधिकारी असलेले चार संचालक प्रथम नेमण्यात आले आहेत. त्यातील बहुसंख्य पदाधिकारी गुजरातचे आहेत. त्यात राजकोटचे मनसुखभाई आहेत. हा मनसुखभाई पॅटर्न ईव्हीएममध्ये राबविला जातोय. या कंपनीत ईव्हीएममध्ये चीप आणि कोड टाकला जातो. तेसुद्धा ही कंपनीत बनविले जाते. त्या ठिकाणी भाजपाने चार संचालक नेमले असतील तर मनसुखभाई आणि चंदीगड पॅटर्नच्या पुढची लोकसभा लढली जाईल का? अशी शंका लोकांच्या मनात आहे. आधीच लोकांचा ईव्हीएमवर विश्वस राहिला नाही. यात देशभरात ज्या ईव्हीएम सापडत आहेत. त्या कोणाच्या मालकीच्या आहेत. ईव्हीएम निर्माण करणाऱ्या कंपनीवर भाजपाने त्यांचे संचालक का नेमले आहे? असा सवाल संजय राऊत यांनी भाजपावर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -