घरदेश-विदेशहिपॅटायटीस सी आणि एचआयव्हीचे औषध कोरोनावर प्रभावी - शास्त्रज्ञांचा दावा

हिपॅटायटीस सी आणि एचआयव्हीचे औषध कोरोनावर प्रभावी – शास्त्रज्ञांचा दावा

Subscribe

सीआयआरबीएससी येथील शास्त्रज्ञ कोविड -१९ व्हायरसच्या औषधाच्या शोधावर संशोधन करण्यात यशस्वी

जामिया मिलिया इस्लामियाच्या सेंटर फॉर इंटर-डिसिप्लिन रिसर्च इन बेसिक सायन्सेस (सीआयआरबीएससी) येथील शास्त्रज्ञ कोविड -१९ व्हायरसच्या औषधाच्या शोधावर संशोधन करण्यात यशस्वी झाले आहेत. शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, हेपेटायटीस सी आणि एचआयव्हीच्या संसर्गापासून बचाव करणारी औषधं कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देखील उपयोगी ठरू शकतात.

ही दोन्ही औषधं कोरोना रूग्णांच्या उपचारांकरता प्रभावी आहेत, मात्र प्रथम त्याची क्लिनिकल चाचणी घेतली पाहिजे, असे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे. तसेच जामियाच्या संशोधनाला प्रतिष्ठित जर्नल बायो सायन्स रिपोर्टकडून देखील मान्यता मिळाली आहे. सीआयआरबीएससीच्या संशोधन पथकाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. इम्तियाज हसन यांच्या मते, कोरोनाच्या मुख्य प्रोटीनच्या क्रिस्टल संरचनेच्या सहाय्याने औषधांना संभाव्य उपचारात्मक पर्याय शोधण्याचा प्रयोगशाळेत प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

कोरोनासाठी पर्यायी उपचार ठरू शकतात

या संशोधनात ग्लॅकाप्रिव्हिर आणि मार्व्हिओक हे कोरोनाच्या मुख्य प्रोटीनचे सर्वोत्तम प्रतिबंधक म्हणून ओळखले गेले असून ते कोरोनासाठी पर्यायी उपचार म्हणून वापरले जाऊ शकते. ग्लॅकाप्रिविर हे अँटी-व्हायरल औषध आहे, जे हेपेटायटीस सी विषाणू-संक्रमित रूग्णांच्या उपचारांमध्ये वापरले जाते, तसेच एचआयव्ही संसर्गापासून बचाव करण्यासाठी देखील मॅराव्हिरोकचा वापर केला जातो.


पतंजलीने कोरोनाला हरविण्यासाठी सुरू केली वैद्यकीय चाचणी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -