लहानपणी वडिलांनी लैंगिक अत्याचार केला.. स्वाती मालीवाल यांचा खळबळजनक खुलासा

नवी दिल्ली : दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. लहानपणी माझ्या वडिलांनी माझ्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले आहेत. ते मला मारहाण करायचे. मी त्यांच्यापासून वाचण्यासाठी पलंगाखाली लपायचे, असा आरोप मालीवाल यांनी केला आहे.

एका कार्यक्रमादरम्यान मालीवाल यांनी सांगितले की, मला अजूनही माझ्या वडिलांनी लैंगिक शोषण केल्याचे आठवते. माझे वडील घरी आल्यावर मी खूप घाबरायचे. मी भीतीने अनेक रात्र पलंगाखाली घालवल्या. मी नेहमी घाबरलेली असायची. त्यावेळी माझ्या मनात विचार यायचा की अशा माणसांना धडा शिकवण्यासाठी काय करायला हवे. त्यांनी पुढे सांगितले की, माझ्या वडिलांना खूप राग यायचा. ते कधी कधी माझे केस पकडून भिंतीवर आदळायचे. यावेळी रक्तही वाहायचे आणि खूप वेदनागी व्हायच्या.

स्वाती मालीवाल यांनी त्यांना या आघातातून बाहेर पडण्याचे श्रेय त्यांची आई, काकू, आजोबा आणि आजीला दिले. त्यांनी सांगितले की, “माझी आई, मावशी आणि माझे आजी-आजोबा नसते तर मी माझ्या बालपणीच्या या आघातातून कधीच बाहेर पडले असते का मला माहीत नाही.”

मला या घटनांमधून जाणवले की, जेव्हा खूप अत्याचार होतात, तेव्हा खूप बदलही होतात, असे मालवीया यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, “अत्याचार तुमच्या आत एक आग निर्माण करते. या आगीला तुम्ही योग्य ठिकाणी लावलात तर तुम्ही महान गोष्टी करू शकता.”

जपानी मुलीसोबत गैरवर्तन प्रकरणी मालीवाल यांचे वक्तव्य
होळीला रंग लावताना जपानी तरुणीसोबत झालेल्या गैरवर्तन प्रकरणी स्वाती मालीवाल म्हणाल्या की, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये काही तरुण एका जपानी महिलेला होळीचा रंग लावत होते. त्या तरुणांनी तिचा विनयभंग केल्याचा आरोप तिने केला आहे. ती मदतीसाठी आरडाओरडा करत होती, मात्र आरोपी तरुण थांबला नाही. याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच त्या तरुणांची ओळख पटवून त्यांना तुरुंगात पाठवण्यास सांगितले आहे.