Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश दडून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेणार हेरॉन मार्क-2; सोडण्यात आले अत्याधुनिक ड्रोन

दडून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेणार हेरॉन मार्क-2; सोडण्यात आले अत्याधुनिक ड्रोन

Subscribe

अनंतनागमधील कोकरनागच्या जंगलात सहाव्या दिवशीही दहशतवाद्यांशी चकमक सुरूच आहे. याठिकाणी किमान दोन दहशतवादी लपल्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये भारतीय सैन्याची दहशतवाद्यांसोबतच चकमक सुरू आहे. यादरम्यान अनंतनागच्या जंगलात काही दहशतवादी दडून बसल्याची माहिती आहे. याच दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी भारतीय सैन्याने आता मोठे पाऊल उचलले आहे. या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी हेरॉन मार्क-2 नावाचा अत्याधुनिक ड्रोन सोडण्यात आला असून, याद्वारे ते दहशतवाद्यांचा शोध घेणार आहेत.(Heron Mark 2 will search for hidden terrorists Sophisticated drones were released)

अनंतनागमधील कोकरनागच्या जंगलात सहाव्या दिवशीही दहशतवाद्यांशी चकमक सुरूच आहे. याठिकाणी किमान दोन दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांच्या शोध मोहिमेत लष्कराचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अत्याधुनिक हेरॉन मार्क-2 ड्रोनही दाखल करण्यात आले आहे. यादरम्यानच जंगलात अधूनमधून गोळीबारही होत असून, लष्कराचे ड्रोन वरून बॉम्ब फेकत आहेत. जणेकरून गुफांमध्ये बसलेले दहशतवादी यामुळे बाहेर येतील आणि त्यांचा खात्मा करता येईल हा यामागील उद्देश आहे.

- Advertisement -

हेही वाचा : माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला सोडणार नाही म्हणत प्रेयसीचा प्रियकरावर चाकूहल्ला

जमिनीपासून आकाशापर्यंत मोहीम

लष्कराला कोणत्याही किंमतीत या दहशतवाद्यांचा खात्मा करून काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित करायीच आहे. यासाठीच भारतीय सैन्याकडून जमिनीपासून आकाशापर्यंत मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोकरनागचे हे वनक्षेत्र खूप उंचावर आहे. इथे आजूबाजूला डोंगर, गुहा आणि झाडी आहेत. याचा फायदा घेत दहशतवादी अजूनही दडून बसलेले आहेत. मात्र, लष्कराने संपूर्ण जंगलाला वेढा घातला आहे. त्याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण निरीक्षण केले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा : भोपाळमध्ये होणारी सभा रद्द; ‘या’ कारणामुळे इंडिया आघाडी बॅकफूटवर

असे करते हेरॉन मार्क-2 काम

दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेत लष्कराने हेरॉन मार्क-2 उतरवले आहे. हे ड्रोन दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे पावसातही ड्रोन काम करत राहतो. त्याचवेळी, हे 15 किलोमीटर अंतरावर बसून देखील ऑपरेट केले जाऊ शकते. हे ड्रोन एकाच वेळी पाच बाजूंनी गोळीबार करू शकते. हे इस्रायलच्या एरोस्पेस इंडस्ट्रीजने बनवले आहे. यादरम्यानच शनिवारी या ड्रोनने एका दहशतवाद्याला यमसदनी पाठवले.

- Advertisment -