घरताज्या घडामोडीकोविशील्डला ग्रीन पाससाठी सर्वोच्च पातळीवर प्रयत्न सुरू - अदर पूनवाला

कोविशील्डला ग्रीन पाससाठी सर्वोच्च पातळीवर प्रयत्न सुरू – अदर पूनवाला

Subscribe

सीरम इंस्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी Covishield ला युरोपियन युनियनमार्फत ग्रीन पास मिळवून देण्यासाठी सर्वोच्च पातळीवर प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले आहे. सीरमच्या कोविशील्डला परवानगी दिलेल्या लसीच्या यादीत समावेश न केल्यानेच त्यांनी हा विषय आता लावून धरला आहे. या विषयावर लवकरच तोडगा निघेल असेही त्यांनी म्हटले आहे. कोविशिल्ड घेतलेल्या अनेक भारतीयांना आंतरराष्ट्रीय प्रवासा दरम्यान अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळेच हा विषय आता मोठ्या पातळीवर नेल्याचे ट्विट अदर पूनावाला यांनी केले आहे.

- Advertisement -

युरोपियन मेडिकल एजन्सी (EMA) मार्फत युकेमध्ये तयार करण्यात आलेली अस्ट्राझेनका या लसीलाच मान्यता देण्यात आली आहे. पण भारतातील सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशील्डला अद्यापही वॅक्सीन पासपोर्ट म्हणून मान्यता मिळालेली नाही. जगभरातील अनेक देशांमध्ये भारतीय प्रवाशांना येण्यासाठी मज्जाव घालण्यात आलेला आहे. पण एकदा ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील बंदी उठली की अनेकांना परदेशी प्रवासासाठी वॅक्सीन पासपोर्टचा मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. कारण आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी केवळ मंजुरी देण्यात आलेली लस घेतलेल्या प्रवाशांनाच परवानगी मिळू शकते. त्यामुळे यापुढच्या काळातही मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

ईएमए ही युरोपियन युनियनची एक एजन्सी असून वैद्यकीय उत्पादनांची पडताळणी आणि निरीक्षणाचे काम एजन्सीमार्फत होत असते. ईएमएमार्फत आतापर्यंत केवळ चार लसींनाच परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये बायोएनटेकची फायझर, मॉडर्ना, ऑक्सफर्ड अस्ट्राझेनेका आणि जॉन्सन एण्ड जॉन्सनची लस या तीन लसींनाच युरोपियन युनियनमार्फत परवानगी मिळालेली आहे. या लसी घेतलेल्या व्यक्तींनाच केवळ प्रवासासाठीचा ग्रीन पास देण्यात आला आहे. पण या एजन्सीकडून येत्या काळात आणखी लसींनाही परवानगी मिळू शकते.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -