Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'या' देशात सर्वाधिक लहान मुलांचा कोरोनामुळे मृत्यू

‘या’ देशात सर्वाधिक लहान मुलांचा कोरोनामुळे मृत्यू

इंडोनेशियात जुलै महिन्यातच दर आठवड्याला कोरोनामुळे शंभरहून अधिक बालकांचा मृत्यू होत आहे

Related Story

- Advertisement -

इंडोनेशियात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटने धूमाकूळ घातला असून यात शेकडो लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. इतर देशांमध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या लहान मुलांच्या संख्येच्या तुलनेत इंडोनेशियातील मृत मुलांचा आकडा सर्वाधिक आहे. यामुळे कोरोनाचा लहान मुलांना कमी धोका असल्याचा दावा करणाऱ्या संशोधकांपुढे नवीन आव्हान उभे ठाकले आहे. इंडोनेशियात जुलै महिन्यातच दर आठवड्याला कोरोनामुळे शंभरहून अधिक बालकांचा मृत्यू होत आहे. तर दुसरीकडे कोरोनाबाधितांच्या आकड्यातही वाढ होत आहे. त्यातही लहान मुलांचीच संख्या अधिक आहे.

डेल्टाचा धोका ओळखून इंडोनेशियात लहान मुलांचे शाळेतच लसीकरण करण्यात येत होते. पण कोरोनाचा संसर्ग वाढल्याने येथे लॉक डाऊन करण्यात आले शाळाही बंद करण्यात आल्या. यामुळे मुलांचे लसीकरणही थांबले. इंडोनेशियात साथीचे आजार ही सामान्य गोष्ट आहे. यामुळे मुलांना शाळेतच पोलिओ, गालगुंड, कावीळ, मलेरिया, टायफाईडच्या लसी देण्यात येतात. आता लहान मुलांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. पण शाळा बंद असल्याने मुलांना लस देण्यात आलेली नाही. हे देखील या मृत्यूमागचे कारण असल्याचे सांगण्यात आले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – covid19: तिसऱ्या लाटेला थोपण्यासाठी Vaccination पुरेसे नाही, आरोग्य तज्ञांचा अलर्ट

- Advertisement -