देशात प्रथमच २४ तासांत ११ हजार नव्या रुग्णांची नोंद; ३८६ जणांचा मृत्यू

coronavirus community spreed started in india said ima
देशात समूह संसर्गास सुरुवात IMAचा इशारा

देशात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्या नंतर कोरोना संक्रमितांची संख्या वाढत चालल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. सलग नऊ दिवस दहा हजारांच्या आसपास वाढणारी संख्या शुक्रवारी ११ हजारांच्या जवळ पोहोचली. देशात गेल्या चोवीस तासांमध्ये पहिल्यांदाच ११ हजार ४५८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण करोनाबाधितांचा आकडा ३ लाख ८ हजार ९९३ वर पोहोचला आहे.

देशातील मृत्यूंचा आकडा ९ हजारांच्या पार गेला आहे. देशात गेल्या २४ तासांत ३८६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात ८ हजार ८८४ जणांचा मृत्यू झाला आहे. गेले दोन दिवस मृत्यूचा आकडा ३०० हून अधिक आहे. भारतामध्ये एक लाख लोकसंख्येमागे ०.५९ मृत्यू झाले असून जगभरातील हे सर्वात कमी प्रमाण आहे.


हेही वाचा – कोरोना उपचारामध्ये अ‍ॅझीथ्रोमायसीनचा वापर घातक; औषधाचा वापर थांबवणार?


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात समूह संसर्ग झाला नसल्याचं म्हटलं आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४९.४७ टक्के असल्याचंही सांगितलं. देशात १ लाख ५४ हजार ३३० रुग्ण बरे झाले असून १ लाख ४५ हजार ७७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात सर्वाधिक रूग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखांच्या पार गेला आहे. महाराष्ट्रानंतर गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, प. बंगाल या राज्यांमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.