Corona Update: देशात २४ तासांत सर्वाधिक १७ हजार २९६ नवे रुग्ण, तर ४०९ मृत्यू!

Corona
कोरोनाचे मृत्यू

देशात सलग तिसऱ्या दिवशी २४ तासांत कोरोनाबाधित नव्या रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. देशात मागील २४ तासांत १७ हजार २९६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख ९० हजार ४०१वर पोहोचला आहे. तर यापैकी आतापर्यंत १५ हजार ३०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या १ लाख ८९ हजार ४६३ जणांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत २ लाख ८५ हजार ६३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील रिकव्हरी रेट ५८.३४ टक्के इतका आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रायलयाने दिली आहे.

 

तसेच देशात दिवसेंदिवस कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण वाढत आहे. काल २ लाख १५ हजार ४४६ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत ७७ लाख ७६ हजार २२८ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने दिली आहे.

देशात सर्वाधिक कोरोनाचा फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ४७ हजार ७४१ वर पोहोचला असून मृतांचा आकडा ६ हजार ९३१ झाला आहे. तसेच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा ७० हजार ८७८ आहे. तर मृतांचा आकडा ४ हजार ६२ झाला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात आढळले आहेत.


हेही वाचा – जगात २४ तासांत १.७६ लाख नवे कोरोना रुग्ण, एकूण बाधितांचा आकडा ९७ लाख पार!