घरCORONA UPDATEदेशात कोरोनाचा पुन्हा नवा विक्रम, २४ तासांत ३२ हजारांहून अधिक रुग्णांची वाढ!

देशात कोरोनाचा पुन्हा नवा विक्रम, २४ तासांत ३२ हजारांहून अधिक रुग्णांची वाढ!

Subscribe

काही दिवसांपासून देशात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ होताना दिसत आहे. देशात २४ तासांत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत आजपर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३२ हजार ६९५ कोरोनाबाधित रुग्णांचा वाढ झाली असून ६०६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ९ लाख ६८ हजार ८७६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २४ हजार ९१५ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख १२ हजार ८१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ३ लाख ३१ हजार १४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

तसेच देशातील कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा रेट ६३.२४ टक्के इतका आहेत. तर कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ९६.०९ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच देशातील मृत्यूदर हा ३.९१ टक्के इतका आहे, अशी माहिती भारत सरकारने दिली आहे.

देशात १५ जुलैपर्यंत १ कोटी २७ लाख ३९ हजार ४९० नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे काल ३ लाख २६ हजार ८२६ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदने (ICMR) दिली आहे.

- Advertisement -


हेही वाचा – Corona: अमेरिकेत गेल्या २४ तासांत ६७,३३२ रुग्णांची भर, एकूण आकडा ३६ लाख पार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -