घरCORONA UPDATEचिंताजनक! देशात २४ तासांत आढळले सर्वाधिक ३४,९५६ नवे रुग्ण, ६८७ जणांचा मृत्यू!

चिंताजनक! देशात २४ तासांत आढळले सर्वाधिक ३४,९५६ नवे रुग्ण, ६८७ जणांचा मृत्यू!

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. काही दिवसांपासून देशातील नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ होताना दिसत आहे. देशातील कोरोबाधित रुग्णसंख्येने १० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात २४ तासांत सर्वाधिक ३४ हजार ९५६ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली असून ६८७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ३ हजार ८३२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २५ हजार ६०२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून ६ लाख ३५ हजार ७५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ३ लाख ४२ हजार ४७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

देशातील कोरोना रुग्ण रिकव्हरी होण्याचा रेट ६३.७१ टक्के इतका आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचा फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ८४ हजार २८१वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे ११ हजार १९४ जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रानंतर तामिळनाडू, दिल्ली या राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूतील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५६ हजार ३६९ असून दिल्लीतील १ लाख १८ हजार ६४५ इतकी आहे. तसेच आतापर्यंत तामिळनाडून कोरोनामुळे २ हजार २३६ जणांचा मृत्यू झाला असून दिल्लीत ३ हजार ५४५ जण मृत्यूमुखी पडले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – अमेरिकेत कोरोनाचा कहर; २४ तासांत ६८ हजार ४२८ रुग्णांची वाढ, ९७४ जण मृत्यूमुखी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -