घरCORONA UPDATECorona Update: देशात कोरोनाने रेकॉर्ड तोडला, २४ तासांत ४५ हजार ७२० नव्या...

Corona Update: देशात कोरोनाने रेकॉर्ड तोडला, २४ तासांत ४५ हजार ७२० नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

देशात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. देशात गेल्या २४ तासांत आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत सर्वात मोठी वाढत झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत तब्बल ४५ हजार ७२० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांच्या संख्येने १२ लाखांचा टप्पा पार केला आहे. तसेच २४ तासांत सर्वाधिक १ हजार १२९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा संख्या १२ लाख ३८ हजार ६३५वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत २९ हजार ८६१ मृत्यू झाला आहे. तसेच ७ लाख ८२ हजार ६०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ४ लाख २६ हजार १६७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.

- Advertisement -

 

दरम्यान २३ जुलै पर्यंत देशात १ कोटी ५० लाख ७५ हजार ३६९ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या होत्या. यापैकी बुधवारी ३ लाख ५० हजार ८२३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदने (ICMR) दिली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -