घरताज्या घडामोडीदेशात कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत ४९,३१० नवे रुग्ण

देशात कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत ४९,३१० नवे रुग्ण

Subscribe

गेल्या २४ तासांत जी वाढ झाली आहे ती धडकी भरवणारी आहे. आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत सर्वात मोठी वाढ झाली असून देशात गेल्या २४ तासांत तब्बल ४९ हजार ३१० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांच्या संख्येने १२ लाखांचा टप्पा पार केला आहे.

देशात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. देशात गेल्या २४ तासांत जी वाढ झाली आहे ती धडकी भरवणारी आहे. आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत सर्वात मोठी वाढ झाली असून देशात गेल्या २४ तासांत तब्बल ४९ हजार ३१० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांच्या संख्येने १२ लाखांचा टप्पा पार केला आहे. तसेच २४ तासांत सर्वाधिक ७४० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या १२ लाख ८७ हजार ९४५ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ३० हजार ६०१ मृत्यू झाला आहे. तसेच ८ लाख १७ हजार २०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ४ लाख ४० हजार १३५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.

- Advertisement -

 राज्यात २४ तासांत तब्बल ९८९५ नवे रूग्ण

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत तब्बल ९ हजार ८९५ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २९८ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ४७ हजार ५०२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ६ हजार ४८४ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ९४ हजार २५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.९ % एवढे झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आयसोलेशनमध्ये केस कापणं पडलं महागात, भरावा लागला लाखोंचा दंड!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -