घरCORONA UPDATEगेल्या २४ तासांत देशात ८ हजार ३८० नव्या रुग्णांची नोंद

गेल्या २४ तासांत देशात ८ हजार ३८० नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १ लाख ८२ हजार १४३ वर पोहोचला आहे. तर मृतांची संख्या वाढून ५ हजार १६४ झाली आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. गेल्या चोवीस तासात आठ हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी मृतांची संख्याही पाच हजारांच्या पुढे गेली. गेल्या २४ तासांत देशात ८ हजार ३८० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १ लाख ८२ हजार १४३ वर पोहोचला आहे. तर मृतांची संख्या वाढून ५ हजार १६४ झाली आहे.

देशात महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ६५ हजार १६८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ३४ हजार ८९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर २८ हजार ८१ लोक बरे झाले आहेत. त्याच वेळी, २ हजार १९७ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रानंतर तामिळनाडूमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तामिळनाडूमध्ये २१ हजार १८४ कोरोनाचे रुग्ण असून ९ हजार २४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत १६० जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

राजधानी दिल्लीत कोरोनाचे १८ हजार ५४९ रुग्ण असून, त्यापैकी १० हजार ५८ सक्रिय रूग्ण आहेत. दरम्यान, ८ हजार ७५ लोक बरे झाले आहेत, तर ४१६ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात ७ हजार ८९१ रुग्ण आसून ३ हजार ४ सक्रिय रूग्ण आहेत. आतापर्यंत ४ हजार ४४४ लोक बरे झाले आहेत, तर ३४३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गामुळे गुजरातलाही बाधा झाली आहे.गुजरातमध्ये आतापर्यंत १६ हजार ३५६ रुग्ण आढळले आहेत. मृतांची संख्या १००७ वर पोहोचली आहे.

रुग्ण दुप्पट होण्याचा दर वाढला

आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की गेल्या तीन दिवसांत कोरोना संक्रमणाची दुप्पट वाढ होण्याची वेळ १५.४ दिवसांपर्यंत वाढली आहे. तर गेल्या १४ दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचा दर १३.३ दिवस होता. मृत्यूचे प्रमाणही गेल्या आठवड्यात २.५५ टक्के झाला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -