घरCORONA UPDATEमहाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांना Delta Plus Variant चा सर्वाधिक धोका, तातडीने पावलं...

महाराष्ट्रासह ‘या’ ३ राज्यांना Delta Plus Variant चा सर्वाधिक धोका, तातडीने पावलं उचलण्याचा केंद्राचा इशारा

Subscribe

डेल्टा प्लस व्हेरिएंट आतापर्यंत ९ देशांमध्ये आढळून आला आहे

कोरोना,म्युकरमायकोसिस नंतर आता डेल्टा प्लस व्हेरिएंटने देशात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना दुसरीकडे कोरोनाचा नवा डेल्टाप्लस व्हेरिएंट समोर आला आहे. देशात मंगळवारी डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण समोर आले आहेत. त्यातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात सापडलेले १६ रुग्ण हे जळगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यात आढळले आहेत. महाराष्ट्र,मध्यप्रदेश आणि केरळ राज्याला केंद्र सरकारने अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या जरी कमी असली तरी या व्हेरिएंटची क्षमता आणि त्याच्या प्रसाराचा वेग पाहता केंद्र सरकारने या तीनही राज्यांना तातडीने पावले उचलण्याचा इशारा देण्यात आला आहे. (highest threat of Delta Plus variant to 3 states including Maharashtra,Center Health ministry warns to take immediate steps)

- Advertisement -

कोरोना डेल्टा व्हेरिएंट हा भारतासह एकूण ८० देशांमध्ये आढळल्याचे समोर आले आहे. तर डेल्टा प्लस व्हेरिएंट आतापर्यंत अमेरिका,ब्रिटन,पोर्लुगाल,स्वित्झर्लंड,जपान,पोलंड,नेपाळ,चीन आणि रशिया या ९ देशांमध्ये आढळून आला आहे. भारतात एकूण २१ रुग्णांचा समावेश आहे. त्यातील १६ रुग्ण महाराष्ट्रातील असून इतर रुग्ण केरळ आणि मध्य प्रदेशमधून आढळले आहेत. त्यातही महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यात तर केरळमध्ये पलक्कड आणि पथ्थनमथित्ता तर मध्य प्रदेशामधील भोपाळ आणि शिवपुरी या जिल्ह्यांमध्ये एकूण मिळून डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २२ रुग्ण समोर आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

तातडीने पावले उचलून कार्यक्षमतेने काम करा

महाराष्ट्र,केरळ आणि मध्य प्रदेशमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण समोर आल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तिन्ही राज्यांना स्थानिक आरोग्य व्यवस्थापनाने डेल्ट प्लस व्हेरिएंट संदर्भात तातडीने पाऊले उचलून अधिक लक्षपूर्वक आणि कार्यक्षमतेने काम करणे आवश्यक आहे. नव्या व्हेरिएंटची क्षमता आणि त्याच्या वेगाने प्रसार होत असल्यामुळे आता अधिक सर्तक राहण्याची गरज असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत त्या ठिकामी कंटेनमेंट झोन,गर्दी कमी करणे, चाचण्या करणे, जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे यासारख्या उपाययोजना राबवण्याचे आदेश आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.

 


हेही वाचा - Vaccine: २ वर्षांवरील मुलांना ‘या’ महिन्यात मिळणार covaxin लस, AIIMSच्या डॉक्टरांची माहिती

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -