घरताज्या घडामोडीHijab controversy: हिजाबसंबंधित आंदोलनात सामील झाल्यामुळे १० विद्यार्थिनींवर FIR दाखल; कॉलेजमधून परत...

Hijab controversy: हिजाबसंबंधित आंदोलनात सामील झाल्यामुळे १० विद्यार्थिनींवर FIR दाखल; कॉलेजमधून परत पाठवल्याने मुख्याध्यापकांना मारण्याची धमकी

Subscribe

बाहेरीला लोकांमुळे खूप संभ्रम निर्माण होत आहेत. जर कॉलेज प्रशासन, विद्यार्थी आणि पालकांनी हे प्रकरण मिटवले असते तर आतापर्यंत हे प्रकरण सुटले असते, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले.

हिजाबसंबंधित आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस आणि प्रशासन कडक कारवाई करताना दिसत आहे. कर्नाटक पोलिसांनी तुमकूरमध्ये गुरुवारी झालेल्या आंदोलनात सामिल असलेल्या १० विद्यार्थिनींवर एफआयआर दाखल केला आहे. तर शिवमोग्गा जिल्ह्यामध्ये एका प्री युनिव्हर्सिटी कॉलजेच्या ५८ विद्यार्थिनींना आंदोलन केल्यामुळे कॉलेजमधून काढून टाकण्यात आले आहे. तसेच कर्नाटकच्या मदिकेरी जिल्ह्यातील एका ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापकांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या मुख्याध्यापकांनी हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना कॉलेजमधून परत पाठवले होते, ज्यानंतर त्यांना धमकी देण्यात आली आहे. शनिवारी मुख्याध्यापकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

तुमकुरमधील गर्ल्स एम्प्रेस गव्हर्नमेंटचे पीयू कॉलेजबाहेर गुरुवारी झालेल्या आंदोलनात सामील झालेल्या विद्यार्थिनींवर निर्देशाचे उल्लंघन करण्याचा आरोप लावला गेला आहे. विद्यार्थीनींवर एफआयआर दाखल करण्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, ‘बाहेरीला लोकांमुळे खूप संभ्रम निर्माण होत आहेत. जर कॉलेज प्रशासन, विद्यार्थी आणि पालकांनी हे प्रकरण मिटवले असते तर आतापर्यंत हे प्रकरण सुटले असते. मी सर्व प्रकरणाची माहिती घेईन आणि त्यानंतर यावर बोलेन. हिजाब वादावर कर्नाटक हायकोर्टात सुनावणी प्रलंबित आहे. कोर्टाच्या अंतरिम आदेशानुसार, वर्गात विद्यार्थ्यांना हिजाब, बुरखा आणि भगवा गमछा इत्यादी परिधान करण्यावर रोख लावली आहे.’

- Advertisement -

शिवमोग्गा जिल्ह्यातील ५८ विद्यार्थिनींना कॉलेजमधून काढले

कर्नाटकच्या शिवमोग्गा जिल्ह्यातील एका कॉलेजमधील कमीत कमी ५८ विद्यार्थिनींनी हिजाब घालून वर्गात प्रवेश देण्यास परवानगी देण्याबाबतच्या मागणीवर आंदोलन केल्याचा आरोप करत त्यांना कॉलेजमधून काढण्यात आले. हा ५८ विद्यार्थिनीं शिरालाकोप्पाच्या सरकारी प्री-यूनिव्हर्सिटी कॉलेजच्या होत्या.

काही जिल्ह्यांमध्ये प्रवेश मिळण्याच्या मागणीवर हंगामा

कर्नाटकच्या बेलागावी, यादगीर, बेल्लारी, चित्रदुर्गम आणि शिवमोग्गा जिल्ह्यात जेव्हा हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींनी वर्गात प्रवेश करण्याची मागणी केली तेव्हा त्यावेळेस तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बेलागावीमध्ये विजय पॅरा-मेडिकल कॉलेज प्रशासनाने आंदोलनामुळे काल सुट्टीची घोषणा केली होती. तर हरिहरमध्ये एसजेव्हीपी कॉलेजमध्ये विद्यार्थिनींनी वर्गात बहिष्कार टाकला होता. तसेच बल्लारी सरलादेवी कॉलेजमधील खेळाच्या मैदानात आंदोलनसाठी गर्दी झाली होती. कोडागुमधील विद्यार्थिनींनी कॉलेजसमोर फलक घेऊन आंदोलन केले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘हिजाब’मागे दडलंय काय ?


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -