घरदेश-विदेशHijab Row : 'या' देशांमध्ये हिजाब परिधान करण्यावर बंदी, मुस्लिम देशांचाही या...

Hijab Row : ‘या’ देशांमध्ये हिजाब परिधान करण्यावर बंदी, मुस्लिम देशांचाही या यादीत समावेश

Subscribe

कर्नाटकातील एका महाविद्यालयात जानेवारी महिन्यात सहा विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्यामुळे वर्गात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे मोठा गोंधळ सुरू झाला. या घटनेनंतर कर्नाटकसह देशातील अनेक भागात निदर्शनांना सुरुवात झाली. याचे पडसाद अनेक महाविद्यालये आणि शाळांमध्ये दिसून येत आहेत.

कर्नाटकमधील हिजाब प्रकरणी उफाळून आलेला वाद आता संपूर्ण देशभर पसरला आहे. देशातील अनेक ठिकाणी या हिजाब प्रकरणामुळे आंदोलन आणि मोर्चे सुरु आहेत. तर काहींनी त्या विद्यार्थीनीची मागणी रास्त आहे की सरकारची भूमिका योग्य आहे यावरून वाद सुरु केला आहे. आता या वादाच्या भोवऱ्यात इतर देशांमध्येही हिजाब बाबत काय नियम आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण अनेक मुस्लिम देशांमध्ये हिजाब परिधान करण्यावर बंदी आहे.

फ्रान्समध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी

युरोप खंडातील पहिला देश आहे, जिथे 2004 मध्ये शाळांमध्ये हिजाब परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली होती. यानंतर 2011 मध्ये फ्रान्स सरकारने सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी घातली होती. फ्रान्समध्ये हिजाब परिधान केल्यास किंवा संपूर्ण चेहरा झाकल्यास सुमारे 13 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. जर एखाद्या व्यक्तीने महिलेला हिजाब घातला किंवा चेहरा पूर्ण झाकला तर त्यांच्यावर 26 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.

- Advertisement -

चीनमधील शाळांमध्ये हिजाब घालण्यावर बंदी  

शी जिनपिंग सरकारनेही शाळांमध्ये हिजाब घालण्यावर बंदी घातली आहे. चीनमध्ये शाळा आणि सरकारी कार्यालयांमध्ये धर्मपद्धतीनुसार पोशाख घालून आल्यास त्याला प्रवेश नाकारला जातो.

- Advertisement -

डेन्मार्कमध्ये कोणी चेहरा झाकल्यास त्याला 12 हजार रुपयांचा दंड 

डेन्मार्क संसदेने 2017 मध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी घातली. डेन्मार्कमध्ये कोणी चेहरा झाकल्यास त्याला 12 हजार रुपये दंड आणि पुन्हा पकडल्यास सुमारे 85 हजार रुपये दंड आकारला जातो. त्याचप्रमाणे बेल्जियम…नेदरलँड्स…बुल्गेरिया. जर्मनी..कॅनडा हे देश आहेत जिथे हिजाब किंवा चेहरा झाकण्यावर बंदी आहे.

रशियातील शाळांमध्ये हिजाबवर बंदी 

रशियाने २०१२ मध्ये शाळांमध्ये हिजाबवर बंदी घातली होती, त्यानंतर हे प्रकरण तेथील सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आणि न्यायालयानेही सरकारचा निर्णय कायम ठेवत हिजाब घालण्यावर बंदी घातली.

मुस्लिम देशांबद्दल सांगायचे झाल्यास सीरिया आणि इजिप्तसारख्या देशांतील विद्यापीठांनी पूर्ण चेहरा झाकण्यावर बंदी घातली आहे. कोसोवोमध्ये मुलींना हिजाब घालून शाळेत जाता येत नाही. याशिवाय ट्युनिशिया, मोरोक्को, अझरबैजान, लेबनॉन आणि सीरियासारख्या देशांमध्ये हिजाबबाबत कठोर नियम बनवण्यात आले आहेत.

भारतात कसा सुरु झाला वाद?

कर्नाटकातील एका महाविद्यालयात जानेवारी महिन्यात सहा विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्यामुळे वर्गात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे मोठा गोंधळ सुरू झाला. या घटनेनंतर कर्नाटकसह देशातील अनेक भागात निदर्शनांना सुरुवात झाली. याचे पडसाद अनेक महाविद्यालये आणि शाळांमध्ये दिसून येत आहेत.

या घटनेनंतर उफाळून आलेल्या वादानंतर आता अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवावी लागली आहेत, शिमोगामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे आणि काही ठिकाणी पोलिस बळाचा वापरही करण्यात आला आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयाने मोठ्या खंडपीठाकडे पाठवले आहे. अशा स्थितीत हिजाबबाबत आता जो काही निर्णय घेतला जाईल, तो न्यायालय घेईल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -