घरताज्या घडामोडीHijab Row: शुक्रवारी हिजाब घालण्याच्या परवानगीसाठी याचिकाकर्त्यांनी मागणी, आजही कर्नाटक हायकोर्टात युक्तीवाद

Hijab Row: शुक्रवारी हिजाब घालण्याच्या परवानगीसाठी याचिकाकर्त्यांनी मागणी, आजही कर्नाटक हायकोर्टात युक्तीवाद

Subscribe

आजच्या सुनावणीत राज्य सरकारकडून अॅडव्होकेट जनरल प्रभुलिंग नवदगी आपली बाजू खंडपीठासमोर मांडणार.

हिजाब वादाप्रकरणी (Hijab Row) आज पुन्हा एकदा कर्नाटक हायकोर्टात (Karnataka High Court) सुनावणी होणार आहे. यापूर्वी काल, गुरुवारी याप्रकरणी कर्नाटक हायकोर्टात सुनावणी झाली होती. त्यादरम्यान विद्यार्थ्यीनींच्या वकिलांनी त्यांची बाजू खंडपीठासमोर मांडली. यावेळी शुक्रवारी हिजाब घालण्यासाठी परवानगी देण्याची मागणी विद्यार्थीनींच्या वकिलांनी हायकोर्टाकडे केली. शाळेत हिजाब घालून जाण्यावर अडून बसलेल्या विद्यार्थ्यीनींचे वकील म्हणाले की, ‘हिजाबच्या मुद्द्यावर संपूर्ण देशात प्रचंड उन्माद आणि मानसिक अशांतता निर्माण झाली आहे.’

तसेच विद्यार्थीनींच्या वकिलांनी असे मत मांडले की, ‘गरीब मुस्लिम मुलींना वर्गातून बाहेर काढणे हे संविधानाविरोधात आहे. त्यांना कमीत कमी शुक्रवारी आणि रमजानला हिजाब घालण्याची परवानगी दिली जावी. कुरानाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. हिजाब सार्वजनिक व्यवस्थेविरोधात नाहीये.’

- Advertisement -

गुरुवारी सुनावणीदरम्यान राज्य सरकारकडून अॅडव्होकेट जनरल प्रभुलिंग नवदगी यांनी युक्तिवाद केला. त्यांनी याचिकाकर्त्यांच्या शुक्रवारी हिजाब घालण्याच्या मागणीचा विरोध केला. आज होणाऱ्या सुनावणीदरम्यान नवादगी सरकारची बाजू मांडणार आहेत.

नेमका वाद काय?

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात जानेवारी महिन्यात हिजाब घालण्यावरून वाद सुरू झाला. उडुपी येथील कॉलेजमधील काही विद्यार्थींनींनी हिजाब घालून वर्गात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र त्यांना अडवण्यात आले. कॉलेज प्रशासनाने ड्रेसमध्ये समानता असावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. पण यावरून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाद वाढत गेला. याप्रकरणी विद्यार्थीनींनी कर्नाटक हायकोर्टात धाव घेतली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी कर्नाटक हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. अजून अंतिम निकाल याबाबत आलेला नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Hijab Controversy: भारतात हिजाबची गरज नाही, येथे महिलांची केली जाते पूजा; भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांचे वक्तव्य


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -