घरदेश-विदेशHijab Row : काश्मीरमध्येही हिजाब वादाची झळ; वादानंतर शाळा प्रशासनाने घेतला 'हा'...

Hijab Row : काश्मीरमध्येही हिजाब वादाची झळ; वादानंतर शाळा प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

Subscribe

कर्नाटकच्या एका महाविद्यालयातून सुरु झालेल्या हिजाब वादाची झळ आता जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचला आहे. काश्मीर खोऱ्यात हिजाबच्या मुद्द्यावरून चर्चा रंगल्याने एका शाळेच्या व्यवस्थापनेने आपल्या आदेशात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा प्रशासनाने आपल्या जुन्या आदेशात बदल करत शाळेत येताना संपूर्ण चेहरा झाकला जाईल असा नकाब घालू नये असे आवाहन कर्मचाऱ्याना केले आहे.

बारामुल्ला येथील डँगर परिवार शाळेच्या मुख्याध्यापकांनी 25 एप्रिल रोजी एक परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकानुसार, शिक्षकांनी शाळेच्या कालावधीत हिजाब घालू नये. जेणेकरून विद्यार्थ्यांना दिलासा वाटेल आणि शिक्षक, कर्मचार्‍यांशी संवाद साधण्यासाठी पुढे येईल”. मात्र, बुधवारी शाळेने ‘हिजाब’च्या जागी ‘नकाब’ हा शब्द वापरून सुधारित परिपत्रक जारी केले.

- Advertisement -

सोशल मीडियावर परिपत्रक व्हायरल

शाळेचे 25 एप्रिलचे परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यावर अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी या आदेशाचा तीव्र निषेध केला आहे.

- Advertisement -

मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विट करत लिहिले की, ‘मी हिजाबबाबत जारी केलेल्या या पत्राचा निषेध करते. जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपचे राज्य असू शकते परंतु हे इतर राज्यांसारखे नक्कीच नाही, जिथे त्यांनी अल्पसंख्याकांची घरे पाडली आणि त्यांना त्यांच्या आवडीचे कपडे घालू दिले नाहीत.

तर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले की, हा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न आहे. ‘या देशात प्रत्येकाला आपापल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे. आपण धर्मनिरपेक्ष देश आहोत, याचा अर्थ सर्व धर्म समान आहेत, असे आपल्या संविधानात नमूद केले आहे. यात कोणत्याही सरकारने हस्तक्षेप करू नये असे मला वाटते.

यापूर्वी, शाळेने एक आदेश पारित केला होता ज्यामध्ये त्यांनी शिक्षकांना हिजाब घालणे टाळण्यास सांगितले होते. याबाबत स्थानिक राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.


PM Modi Visit Assam : पंतप्रधान मोदी आज आसाम दौऱ्यावर; अनेक प्रकल्पांची पायाभरणी, सभेला करणार संबोधित

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -