भारतीय लष्कराची मोठी कारवाई; हिज्बुलच्या कमांडरला कंठस्नान!

terrorist Asif killed by indian army in kashmir
जम्मू-काश्मीर

सीमावर्ती भागामध्ये गेल्या काही दिवसांपासन दहशतवाद्यांकडून वारंवार घुसखोरीच्या आणि भारतीय जवानांवर हल्ले करण्याच्या कारवाया केल्या जात होत्या. गेल्या दोन दिवसांपासून काश्मीरमध्ये सीमेवरच्या अवंतीपोरा आणि पुलवामा या भागांमध्ये दहशतवाद्यांशी भारतीय लष्कराशी चकमक सुरू होती. या चकमकीमध्ये भारतीय लष्कराला मोठं यश मिळालं असून हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या एका टॉप कमांडरला लष्कराने कंठस्नान घातलं आहे. हा कमांडर वाँटेड रियाज नायकू असल्याची देखील माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अधिक तपास सुरू आहे. पुलवामा भागामध्ये सुरू असलेल्या चकमकीत रियाज नायकूचा खात्मा झाल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय, अवंतीपोरा भागात सुरू असलेल्या चकमकीत देखील दोन दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे. दरम्यान, या कारवाईच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातली मोबाईल इंटरनेट सेवा आज खंडित करण्यात आली आहे.