घरदेश-विदेशPetrol Diesel Prices: मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेल किंमतींचा भडका, जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Prices: मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेल किंमतींचा भडका, जाणून घ्या आजचे दर

Subscribe

लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या राज्यात पेट्रोल डिझेलची मागणी कमी होत असली तरी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच देशात पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. पेट्रोल डिझेल कंपन्यांनी सलग पाच दिवस पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केल्याने सामान्य लोकांना याचा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारापेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने ही दरवाढ झाली असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा काही पैशांची वाढ करण्यात आली आहे. आज दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोलचा दर 92.05 तर डिझेलचा दर प्रतिलीटर 82.61, मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलचा दर 98.36 तर डिझेलचा दर प्रतिलीटर 89.75 इतका आहे.

- Advertisement -

जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर

आज मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलचा दर 98.36 तर डिझेलचा दर प्रतिलीटर 89.75 , पुण्यात पेट्रोल प्रतिलीटर 98.06 रुपये तर डिझेल 88.08 प्रतिलीटर , नवी मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलचा दर 98.56 रूपये तर डिझेल 89.94 रूपये प्रतिलीटर झाला आहे. नाशिक मध्ये पेट्रोलचा प्रतिलीटर दर 98.76 रूपये आणि डिझेल प्रतिलीटर 88.76 रूपये इतका तर औरंगाबाद प्रतिलीटर पेट्रोलचा दर 99.60 रूपये आणि डिझेल 90.99 रूपये प्रतिलीटर इतका झाला आहे.

असा बघा तुमच्या शहरातील इंधनाचा दर 

मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -