घरताज्या घडामोडीहिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी 70.94 टक्के मतदान, फायदा कोणाला?

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी 70.94 टक्के मतदान, फायदा कोणाला?

Subscribe

हिमाचल प्रदेशमध्ये शनिवारी विधानसभेच्या सर्व 68 जागांसाठी मतदान पार पडले. विधानसभेच्या निवडणुकीसाठी 70.94 टक्के मतदान झाले.

हिमाचल प्रदेशमध्ये शनिवारी विधानसभेच्या सर्व 68 जागांसाठी मतदान पार पडले. विधानसभेच्या निवडणुकीसाठी 70.94 टक्के मतदान झाले. उना येथे सर्वाधिक 76.69 टक्के मतदान झाले. सर्वात कमी कुलूमध्ये 67.41 टक्के मतदान झाले. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत विक्रमी 75.57 टक्के मतदान झाले होते. या मतदानानंतर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. (himachal assembly election 2022 voting ends for 68 seats)

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या सर्व जागांसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रामुख्याने लढत आहे. मात्र असे असले तरी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीही (आप) विजयासाठी रिंगणात उतरली आहे. विशेष म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत यंदा मागील निवडणुकीच्या तुलनेत 5 टक्के कमी मतदान झाले आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये कोणता पक्ष विजयी होणार हे, पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

हिमाचल प्रदेशमधील प्रत्येक जिल्ह्यातील मतदान

  • हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 70.94 टक्के मतदान झाले.
  • उना जिल्ह्यात सर्वाधिक 76.69 टक्के मतदान झाले.
  • सोलनमध्ये 73.21 टक्के मतदान झाले.
  • लाहौल स्पीतीमध्ये 67.54 टक्के मतदान झाले.
  • बिलासपूरमध्ये 69.72 टक्के मतदान झाले.
  • चंबामध्ये 70.74 टक्के मतदान झाले.
  • मीरपूरमध्ये 67.07 टक्के मतदान झाले.
  • कांगडामध्ये 71.27 टक्के मतदान झाले.
  • किन्नौरमध्ये 62 टक्के मतदान झाले.
  • कुल्लूमध्ये 70.50 टक्के मतदान झाले.
  • शिमलामध्ये 68.21 टक्के मतदान झाले.
  • मंडी जिल्ह्यात 70.76 टक्के मतदान झाले.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह आणि भाजपचे माजी प्रमुख सतपाल सिंह सत्ती यांच्यासह 68 मतदारसंघातील 412 उमेदवारांचे भवितव्य वोटिंग मशीनमध्ये बंद झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी ट्विट करत म्हटले की, “आज राज्यभरात झालेल्या मतदानात सर्वच वर्गातील मतदारांमध्ये प्रचंड उत्साह होता. मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने निवडणूक प्रचार आणि मतदान शांततेत पार पडले, त्याबद्दल सर्वांचेही आभार”.

- Advertisement -

हेही वाचा – इजिप्तमध्ये कालव्यात बस कोसळून 22 प्रवाशांचा मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -