घरताज्या घडामोडीHimachal Election Result 2022 : मुख्यमंत्री जयराम ठाकूर विजयी; सहाव्यांदा करणार प्रतिनिधित्व

Himachal Election Result 2022 : मुख्यमंत्री जयराम ठाकूर विजयी; सहाव्यांदा करणार प्रतिनिधित्व

Subscribe

हिमालच विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. या निकालात हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सेराज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी 20 हजारांहून अधिक मतांनी ही निवडणूक जिंकल्यांची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता सहाव्यांदा जयराम ठाकून प्रतिनिधित्व करणार आहेत.

हिमालच विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. या निकालात हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सेराज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी 20 हजारांहून अधिक मतांनी ही निवडणूक जिंकल्यांची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता सहाव्यांदा जयराम ठाकून प्रतिनिधित्व करणार आहेत. दरम्यान, जयराम ठाकूर भाजपाचे उमेदवार असून ते विजयी झाले असले तरी, हिमाचलमध्ये भाजपा पिछाडीवर आहे. आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस आघाडीवर असून ४० जागांवर पुढे आहे. (Himachal Election Result 2022 Cm Jairam Thakur Won In Seraj Vidhansabha Seat)

हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या सध्याच्या निकालात काँग्रेस पक्ष ४० जागांवर आघाडीवर आहे. तसेच, भाजपा २५ जागांवर पुढे आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 68 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

हिमाचल प्रदेशच्या पहिल्या निकालानुसार सेराज विधानसभेत जयराम ठाकूर यांना 37 हजार 227 मते मिळाली आहेत. तर, दुसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेसचे उमेदवार गीत राम यांना एकूण 9 हजार 755 मते मिळाली. तसेच, आम आदमी पक्षाचे उमेदवार गीता नंद यांना 230 मते मिळाली आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. हिमाचलमध्ये आतापर्यंत ६८ जागांचे ट्रेंड समोर आले आहेत. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा केवळ २५ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस ३८ जागांवर आघाडीवर आहे. इतर ३ जागांवर अपक्ष उमेदवार पुढे आहेत. त्याचबरोबर आम आदमी पक्षाचे खातेही इथे उघडलेले नाही. या विधानसभा निवडणुकीत हिमाचलमध्ये 1985 च्या समीकरणाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. सत्ताबदलाच्या काळात बदलत्या ट्रेंडनुसार, काँग्रेस पक्षाच्या बाजूनं जनादेश देण्याचं काम हिमाचलच्या जनतेने केले आहे.

- Advertisement -

विनोद तावडे हिमाचलमध्ये दाखल

हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपा आणि काँग्रेसची अटीतटीची लढाई सुरू आहे. हिमाचलमध्ये काँग्रेस आघाडीवर असून भाजपा पिछाडीवर आहे. त्यामुळे पराभवाच्या दिशेने जाणाऱ्या भाजपाने मोर्चेबांधणी करायला सुरूवात केली आहे. भाजपाने विनोद तावडे यांच्याकडे हिमाचर प्रदेशची मोठी जबाबदारी सोपवल्याचे समजते. त्यानुसार विनोद तावडे हिमाचल प्रदेशमध्ये दाखल झाल्याचीही माहिती समोर येत आहे.


हेही वाचा – हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाची मोर्चेबांधणी; विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -