Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Himachal Pradesh : राज्यपालांना धक्काबुक्की; काँग्रेसचे पाच आमदार निलंबित

Himachal Pradesh : राज्यपालांना धक्काबुक्की; काँग्रेसचे पाच आमदार निलंबित

हिमाचल प्रदेशाच्या राज्यपालांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी पाच आमदारांना निलंबित केल्याची घटना समोर आली आहे.

Related Story

- Advertisement -

हिमाचल प्रदेशाच्या राज्यपालांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी पाच आमदारांना निलंबित केल्याची घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशच्या विधानसभा संकुलात शुक्रवारी राज्यपाल बंदारु दत्तात्रेय यांना काँग्रेसच्या पाच आमदारांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उर्वरित अधिवेशन काळासाठी या पाचही आमदारांना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबनाचा ठराव मांडला

राज्यपालांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी विधिमंडळ कामकाज मंत्री सुरेश भारद्वाज यांनी आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला. त्यानुसार सभापती विपीन परमार यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री यांच्यासह पाच आमदारांना निलंबित करण्यात आले.

नेमके काय घडले?

- Advertisement -

सर्वप्रथम विरोधी सदस्यांनी राज्यपालांना सभापतींच्या कक्षासमोर रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचे वाहन काफिला पुढे जात होते. हा प्रकार घडला त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री जयराम ठाकूर, परमार देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यानंतर विधानसभेचे कामकाज शुक्रवारी सोमवारी दुपारी २ पर्यंत तहकूब करण्यात आले होते. पण, नंतर पुन्हा ते बोलवून सभागृहात निलंबनाचा ठराव भारद्वाज यांनी मांडला.

या पाच आमदारांना केले निलंबित

विधानसभेत सुरुवातीपासूनच गोंधळ सुरु होता. तरीही राज्यपालांनी त्या गोंधळातच आपले भाषण सुरु केले. मात्र, आमदारांनी राज्यपालांना भाषण वाचू दिले नाही. सकाळी ११ वाजता कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सदस्य उभे राहिले. अखेर राज्यपालांनी शेवटची ओळ वाचली आणि सगळे भाषण वाचण्यात आल्याचे जाहीर केले. विरोधी पक्षनेते अग्निहोत्री, हर्षवर्धन चौहान, सुंदर सिंह ठाकूर, सत्पाल रायजादा, विनय कुमार ही निलंबित आमदारांची नावे आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – मराठी भाषा दिन: राज ठाकरे म्हणतात…दीदी मी खरंच तुमचा ऋणी आहे


 

- Advertisement -