घरताज्या घडामोडीHimachal Landslide: किनौर येथे प्रवाशांनी भरलेल्या बसवर दरड कोसळली, ढिगाऱ्याखाली ५०-६० जण...

Himachal Landslide: किनौर येथे प्रवाशांनी भरलेल्या बसवर दरड कोसळली, ढिगाऱ्याखाली ५०-६० जण अडकल्याची भिती

Subscribe

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या बस चालक आणि कंडक्टरसह ४ जणांंचे रेस्क्यू करण्यात असल्याची माहिती हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिली

हिमाचल प्रदेशमध्ये दरड कोसळण्याच्या घटनांचे चक्र सुरुच आहे. हिमाचल प्रदेशमधील किनौर जिल्ह्यातील पीओ-शिमला महामार्गावर दरड कोसळली. महामार्गावरुवन जाणाऱ्या एचआरसीटी बसवर, कार आणि ट्ररवर ही दरड कोसळली आणि दरडीखाली वाहने संपूर्णपणे गाढली गेली. ढिगाऱ्याखाली तब्बल ५०-६० लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात. किनौर जिल्ह्यातील मंगूर हरिद्वार मार्गावरील ही बस होती. किनौर जिल्ह्यातील नुगुलसरी भागातील रस्त्यावर दरड कोसळून ५० -६० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या बस चालक आणि कंडक्टरसह ४ जणांंचे रेस्क्यू करण्यात असल्याची माहिती हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिली आहे. रेस्क्यू करण्यात आलेल्या ४ जणांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी NDRF, ITBP, CISF आणि पोलिसांची टीम तैनात करण्यात आली आहे.  (Himachal Landslide in Himachal Pradesh Kinnaur district bus crashed Fear of 50-60 people buried under the pile)

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये जवळपास ३५ ते ४० प्रवासी होते. दुपारी १२:४५ च्या दरम्यान ही घटना घडली आहे. त्यानंतर स्थानिक प्रशासन आणि NDRF कडून तिथे बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याशी बाबचीत करुन घटनेचा आढावा घेतला असून गरज लागल्यास मदत करण्याचे आश्वासन देखील दिले आहे.

- Advertisement -

हिमाचल प्रदेशच्या किनौर जिल्ह्यातील ज्यूरी रोडवर निगोसारी आणि चौरा यामध्ये अचानक एक डोंगर खचला ज्यात एचआरटीसीची एक बस आणि काही लहान वाहने दबली गेली. या वाहनांमध्ये ४०-५० प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. SDM भावानगर मनमोहन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी १२:४५ मिनिटांनी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी अद्याप दरड कोसळत असल्याने बचाव कार्य करण्यात अडथळे येत आहे त्यामुळे NDRF टीम आणि प्रशासनाला बचावकार्य करण्यात अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.


गेल्या काही दिवसांपासून हिमाचलमध्ये अशाप्रकारे दरड कोसळणे त्याचप्रमाणे भूसख्खल होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. किनौरमध्येच काही दिवसांपूर्वी भूसख्खल होऊन संपूर्ण महामार्ग क्षणार्धात नरजेआड झाला होता. या घटनेचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

 


हेही वाचा – ATM मध्ये कॅश नसल्यास बँकांना होणार १० हजारांचा दंड, RBIचा नवा नियम

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -