Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Himachal Landslide Video: हिमाचलच्या सिरमौर येथे भूस्खलनाचा थरार, काही क्षणात कोसळला...

Himachal Landslide Video: हिमाचलच्या सिरमौर येथे भूस्खलनाचा थरार, काही क्षणात कोसळला डोंगर

हिमाचल प्रदेशच्या पावटा शिलाई नॅशनल हायवे ७०७ मध्ये भूस्खलन झाल्याने हायवे जवळपास ५० ते १०० मीटरपर्यंत खचला आहे. त्यामुळे तिथली वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलीय.

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून देशातील अनेक राज्यात पावसाचा कहर पहायला मिळत आहे. पावसामुळे दरड कोसळणे, भूस्खलन होण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये भूस्खलनाची (Himachal Pradesh Landslide) थरकाप उडवणारी घटना घडली आहे. हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यात भूस्खलन होऊन काही क्षणात समोर उभा असलेला डोंगर कोसळला. (Himachal Landslide Video: Landslide in Sirmaur national highway 707 Himachal Pradesh)  हिमाचल प्रदेशच्या पावटा शिलाई नॅशनल हायवे ७०७ मध्ये भूस्खलन झाल्याने हायवे जवळपास ५० ते १०० मीटरपर्यंत खचला आहे. त्यामुळे तिथली वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलीय. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओतून झालेल्या घटनेची दाहकता फार प्रखरशाने दिसून येत आहे.


अतिमुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन डोंगराने संपूर्ण रस्ता गिंळकृत केला. या घटनेत संपूर्ण हायवे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला. भूस्खलनाचा हा थरार मोबाईलमध्ये कैद करण्यात आला काही क्षणात हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

- Advertisement -

 

 हिमाचलच्या सिरमौर येथील भूस्खलनाचा थरार व्हिडिओ पहा 

- Advertisement -

 

लाहोर स्पीतीमध्ये ढगफूटी

हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा कहर सुरु आहे. पावसामुळे हिमाचल प्रदेशच्या विविध भागांमध्ये अनेक दुर्देवी घटन घडत आहेत. लाहोर स्पीति येथे ढगफूटी होऊन अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. यात जवळपास १७५ पर्यटक अडकले आहेत. अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे.

मंडी येथे छप्पर पडून दुर्घटना

हिमाचल प्रदेशच्या मंडी येथे पार्किंगमध्ये छप्पर पडून मोठी दुर्घटना घडली. गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रामनगर येथील मंगवाई पार्किंगमधील छप्पर कोसळून पार्किंगमध्ये असणाऱ्या १२ गाड्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या, अनेक गाड्यांचा वरचा भाग पूर्णपणे खराब झाला. छप्पराखाली अडकलेल्या गाड्या काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

हिमाचलमध्ये ५०० करोडचे नुकसान

हिमाचलमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आतापर्यंत ५०० करोड रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या ४५ दिवसांपासून पावसाने हिमाचल प्रदेशमध्ये होत्याचे नव्हते केले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे २००हून अधिक जणांचे मृत्यू झाले आहेत.


हेही वाचा – International Flights वरील बंदी ३१ ऑगस्टपर्यंत कायम, DGCA ने परिपत्रक केलं जाहीर

- Advertisement -