हिमाचलमध्ये ढगफुटी! नदी-नाल्यांना पूर, आठ जणांच्या मृत्यूची शक्यता

पुरात कॅम्पिंग साईट (Camping Site) वाहून गेली असून सहाजण बेपत्ता झाले आहेत. तर, काही घरेही पाण्याखाली गेली आहेत. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशमध्ये हाहाकार माजला असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानी झाली आहे.

महाराष्ट्रासह देशभरात पावसाने धुमशान माजवलं आहे. हिमाचल प्रदेशमध्येही (Himachal Pradesh) पावसाने रौद्ररुप धारण केलं असून मणिकर्ण खोऱ्यात (Manikarn Valley) तर ढगफुटी झाली आहे. यामुळे आलेल्या पुरात कॅम्पिंग साईट (Camping Site) वाहून गेली असून सातजण बेपत्ता झाले आहेत. तर, आठ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, एका मुलीच्या मृत्यूची अधिकृत माहिती आहे. तर, काही घरेही पाण्याखाली गेली आहेत. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशमध्ये हाहाकार माजला असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानी झाली आहे. (Himachal pradesh monsoon rain cloud-burst in kullu camping sight and 6 person-swept away in manikarn valley)

हेही वाचा – कोकणात पावसाचे धुमशान, जगबुडीने ओलांडली धोका पातळी

कुल्लीचे एडीएम प्रशांत सरकैक यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुल्लूच्या मणिकर्ण खोऱ्यातील चोज गावात ढगफुटी झाली आहे. यामुळे नदी- नाल्यांना भीषण पूर आला असून सातजण बेपत्ता झाले आहेत.

चोज गावात जाणाऱ्या पुलाला तडे गेले असल्याने प्रशासनाने तातडीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. यासाठी पोलीस आणि प्रशासनाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, मलाणा येथील धरणाच्या जागेचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा – मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम, ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा

गेल्या तीन दिवसांपासून हिमाचलमध्ये तुफान पाऊस असल्याने तिथे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, पूर आल्याने धरणांमधले पाणी सोडू शकत नसल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीकिनारी न जाण्याचे आवाहन केले आहे.

पावसाळा सुरु झाल्यापासून पहिल्याच आठवड्यात हिमाचलमध्ये तब्बल ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. तर, रस्ते अपघातही वाढले आहेत. तसेच, आतापर्यंत १ कोटी ३२ लाखांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.

हेही वाचा – पावसाचे धुमशान : मुंबई, ठाण्याला ऑरेंज, तर कोकणाला रेड अलर्ट

दरम्यान, हिमाचल प्रदेशमधील सहा ढाबे, तीन छावण्या आणि एका गोठ्यात बांधलेल्या चार गायीवाहून गेल्या आहेत. तर, गेस्ट हाऊससह इतर काही घरांचेही नुकसान झाले आहे.