Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर राजकारण गुजरात निवडणूक हिमाचल आणि गुजरातमधील निवडणुकांचा निकाल आज लागणार, भाजपा सत्ता कायम ठेवणार का?

हिमाचल आणि गुजरातमधील निवडणुकांचा निकाल आज लागणार, भाजपा सत्ता कायम ठेवणार का?

Subscribe

नवी दिल्ली – गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election Results) निकाल आज जाहीर होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. एक्झिट पोल्सनी गुजरातमध्ये विधानसभेच्या १८२ जागांपैकी १२५ ते १४० जागा मिळवून भाजपा पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा दावा केला आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये ६८ जागांपैकी भाजपाला २५ ते ४० आणि काँघ्रेसला २० ते ३५ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे हिमाचलमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – गुजरातमध्ये मोदींचाच बोलबाला, एक्झिट पोलमधून पुन्हा भाजपला सत्ता

- Advertisement -

मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली असून कोठेही अनुचित प्रकार घडू नये याकरता बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. गुरुवार सायंकाळपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल हाती येऊ शकतो.

पत्रांमार्फत आलेल्या मतांची सर्वांत आधी मोजणी करण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत आलेल्या पत्रांची मतमोजणी करण्यात येईल. पत्रांमार्फत आलेल्या मतांची मोजणी झाल्यानंतर सकाळी ८.३० वाजल्यापासून ईव्हीएमद्वारे मिळालेल्या मतांची मोजणी करण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरातसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक मतगणना निरिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच, मतमोजणीच्या प्रक्रियेत खंड पडू नये याकरताही दोन्ही राज्यात प्रत्येकी दोन निरिक्षक तैनात करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

भाजपा सत्ता कायम राखणार का?

हिमाचल प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता होती. त्यामुळे यावेळीही भाजपा सत्ता कायम राखणार की सत्ताबदल होणार हे पाहावं लागणार आहे. १५ वर्ष भाजपाची सत्ता असलेल्या दिल्ली महापालिकेत आपने सत्तापालट केला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत कोणाला कौल मिळतोय या अवघ्या देशाचं लक्ष लागेललं आहे.

- Advertisment -