प्रत्येक आश्वासन लवकरात लवकर पूर्ण होईल; हिमाचल निवडणुकीतील विजयानंतर राहुल गांधींचे ट्विट

himachal pradesh assembly elections result 2022 rahul gandhi tweets after congress victory

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने भाजपचा पराभव करत विजय प्रस्थापित केला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली. मात्र हिमाचलच्या जनतेने यंदाही सत्ता बदलाचा फॉर्म्युला काय ठेवत काँग्रेसला संधी दिली. 68 जागांपैकी 40 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला, तर भाजपाला 25 जागा जिंकता आल्या आहेत. तर इतर अपक्षांना 3 जागा मिळाल्या. यात आपला खातेही उघडता आले नाही, या विजयानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेशातील जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले की, या निर्णायक विजयासाठी हिमाचल प्रदेशातील जनतेचे मनापासून आभार. सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे हार्दिक अभिनंदन. तुमची मेहनत आणि समर्पण या विजयासाठी शुभेच्छांना पात्र आहे. मी पुन्हा आश्वासन देतो की, जनतेला दिलेले प्रत्येक आश्वासन लवकरात लवकर पूर्ण केले जाईल.

हिमाचल प्रदेशात काँग्रेसला विजय मिळवणे सोपे नव्हते.पण प्रियंका गांधींनी हा विजय सोपा करुन दाखवल. पक्षाच्या सरचिटणीस पदाची भूमिका त्यांनी अतिशय चोख बजावली. हिमाचलमधील जनतेला काँग्रेसच्या बाजूने करण्यात प्रियांका यांनी कोणतीही कसर सोडली नाही. येथील प्रचार संपेपर्यंत त्यांनी आघाडी कायम ठेवली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनिया गांधींनी प्रचारापासून अंतर ठेवले, तर राहुल गांधी भारत जोडो यात्रेत व्यस्त राहिले, अशा स्थितीत त्यांनी हिमाचलमध्ये एकट्याने आघाडी सांभाळली.

काँग्रेसच्या हिमाचल प्रदेश जाहीरनाम्यातील आश्वासने

१) काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात जुनी पेन्शन बहाल करण्याची चर्चा केली होती.

२) पहिल्या कॅबिनेट बैठकीत १ लाख नोकऱ्या देणार असल्याचं काँग्रेसनं म्हटलं होतं.

३) याशिवाय ‘हर घर लक्ष्मी’ अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

४) काँग्रेसने जाहीरनाम्यात प्रत्येक विधानसभेत 4 इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचे सांगितले आहे.

५) यासोबतच केंद्रात सरकार आल्यानंतर लष्करातील 4 वर्षांच्या सेवेचा नियम मागे घेण्याची घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.

६) यासोबतच कृषी आणि फलोत्पादन आयोग स्थापन करणार असून, त्यात शेतकरी आणि बागायतदारांना पुरेसे प्रतिनिधित्व दिले जाईल.

७) हिमाचलमध्ये भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक प्रशासनाचे आश्वासन दिले आहे.

८) राजकीय कारणास्तव कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासाठी जयराम सरकारने केलेल्या सर्व बदल्या रद्द केल्या जातील.


गुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगांचं योगदान, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला