घरCORONA UPDATECorona: आणखी एक महिना वाढवला; 'या' राज्यात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर

Corona: आणखी एक महिना वाढवला; ‘या’ राज्यात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर

Subscribe

कोरोनाच्या वाढत्या संसर्काचा धोका लक्षात घेऊन हिमाचल प्रदेशमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे. देशात सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू असून याचा कालावधी ३१ मे रोजी संपणार आहे. दरम्यान, त्या आधीच हिमाचल प्रदेश सरकारने आणखी एक महिना लॉकडाऊन वाढवला असून आता ३० जूनपर्यंत हिमाचलमध्ये संचारबंदी असणार आहे. विशेष म्हणजे या राज्यात केवळ कोरोनाचा सर्वाधीक प्रादुर्भाव होत असलेल्या जिल्ह्यांमध्येच हा लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. याचे अधिकार त्या त्या जिल्ह्यातील डेप्युटी कमिशनर यांना देण्यात आले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये कोरोनाबाधितांची संख्या २०३ आहे. आतापर्यंत तीन जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला असून ६३ जण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात कोरोनाचे अॅक्टिव्ह केसेस १३७ आहेत.

हेही वाचा – …आणि अंगात पीपीई किट चढवत वडिलांचा मृतदेह नेला अंत्यसंस्काराला!

- Advertisement -

देशात कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख ३८ हजार इतका झाला आहे. देशात २५ मे रोजी सलग चौथ्या दिवशी कोरोनाचे सर्वाधीक रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या २४ तासात देशात ६ हजार ९७७ नवे रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत कोरोनाने ४ हजार ०२१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत १५४ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन वाढवला जात आहे. यात हिमाचल प्रदेशने ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्यण घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -