घरताज्या घडामोडीHimachal Pradesh राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांना धक्काबुक्की, विरोधी पक्षातील चार आमदार निलंबित

Himachal Pradesh राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांना धक्काबुक्की, विरोधी पक्षातील चार आमदार निलंबित

Subscribe

हिमाचल प्रदेशच्या विधानसभा अधिवेशन सत्राच्या पहील्याच दिवशी राज्यपाल(governor) बंडारू दत्तात्रेय यांना धक्काबुक्की करण्यात आली.

हिमाचल प्रदेशच्या विधानसभा अधिवेशन सत्राच्या पहील्याच दिवशी राज्यपाल(governor) बंडारू दत्तात्रेय यांना धक्काबुक्की करण्यात आली. काही आमदारांनी राज्यपालांबरोबर विधानसभा परिसरात धक्काबुक्की केली. त्यानतर काँग्रेसच्या पाच आमदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे.

काँग्रेसच्या आमदारांच्या गैरवर्तनानंतर या आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदेचे कार्यमंत्री सुरेश भारद्वाज यांनी सादर केला. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष विपिन परमार यांनी विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री (Mukesh Agnihotri)यांच्यासह काँग्रेसच्या आमदारांना निलंबित केले.
अधिवेशनच्या पहील्या दिवशी राज्यपाल बंडारु दत्तात्रेय यांनी अभिभाषण केले. त्यानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासोबत ते सदनातून राज भवनाकडे निघाले असता विरोधी पक्षातील काही सदस्यांनी त्यांना घेराव घालत त्यांना अडवले. धक्काबुक्की केली. तर काहीजणांनी त्यांच्या पाठीवर अभिभाषणाच्या प्रती फेकल्या. तर काहीजणांनी त्यांच्या कारच्या बोनेटवर चढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ही कृती म्हणजे राज्यपालांवर हल्लाच असल्याचे मुख्यमंत्री ठाकूर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -