घरदेश-विदेशअरुणाचल प्रदेश चीनचा नव्हे, भारताचाच अविभाज्य भाग, अमेरिकेच्या संसदेत ठराव

अरुणाचल प्रदेश चीनचा नव्हे, भारताचाच अविभाज्य भाग, अमेरिकेच्या संसदेत ठराव

Subscribe

वॉशिंग्टन : चीन आणि अरुणाचल प्रदेशला विभाजित करणारी मॅकमोहन रेषा ही अमेरिकेने आंतरराष्ट्रीय सीमा मानली आहे. या मुद्द्यावर अमेरिकन संसदेत द्विपक्षीय ठराव मांडण्यात आला असून, त्यात अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग मानला गेला आहे. खासदार बिल हेगर्टी आणि जेफ मार्कल यांनी हा ठराव मांडला आहे.

चीन हा खुल्या आणि स्वतंत्र हिंदी प्रशांत महासागरासाठी आव्हान बनला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने आपल्या राजनैतिक सहयोगी देशांच्या खांद्याला खांदा लावून, विशेषत: भारतासोबत उभे राहणे आवश्यक आहे, असे खासदार बिल हेगर्टी आणि जेफ मार्कल यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

अमेरिकन संसदेच्या या द्विपक्षीय ठरावात अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग मानला आहे. तसेच, एलएसीवरील परिस्थिती बदलण्याचा चीनचा प्रयत्न तसेच त्यांच्या सैनिकी कारवाईवर टीकाही करण्यात आली आहे. भारत-अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याबरोबरच क्वाडमधील सहकार्य वाढविण्याबाबतचा मुद्दाही या प्रस्तावात मांडण्यात आला आहे. एलएसीच्या पूर्वेकडील भागात चीनचे सैनिक आणि भारताच्या जवानांमध्ये हाणामारी झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन संसदेत हा ठराव मांडला गेला आहे.

- Advertisement -

अमेरिका अरुणाचल प्रदेशला चीनचा नव्हे तर भारताचा अविभाज्य भाग मानते, असे या ठरावात म्हटले आहे. सैनिकी ताकदीवर एलएसीवरील परिस्थिती बदलण्याच्या चीनचे प्रयत्न, वादग्रस्त ठिकाणी चीनने गाव वसवणे आणि भारताचा अरुणाचल प्रदेश चीनने आपल्या नकाशात दाखवणे या सर्वांबाबत अमेरिकन खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासोबतच भूतानच्या सीमेवरील चीनच्या दाव्यावरही टीका करण्यात आली आहे.

यूएस सदनाच्या दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे मांडलेल्या या ठरावात, चीनच्या चिथावणीखोर कृतीविरोधात भारताने घेतलेल्या भूमिकेची प्रशंसा देखील करण्यात आली आहे. भारतासोबत तांत्रिक आणि आर्थिक संबंध मजबूत करण्यावरही भर देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -