घरताज्या घडामोडीऑनलाईन क्लासमध्ये पॉर्न व्हिडीओ!

ऑनलाईन क्लासमध्ये पॉर्न व्हिडीओ!

Subscribe

कोरोना व्हायरसमुळे सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ऑनलाईन शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग भरवले जात आहेत. त्यामुळे मुले सध्या घरूनच अभ्यास करत आहेत. मात्र हिमाचल प्रदेशमधील एका शाळेच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरू असताना एकच गोंधळ उडाला. या क्लासमध्ये जे काही झालं ते पाहून मुलांचे पालकही संतापले.

हिमाचलमधील सेंट ल्युकल या शाळेतील एका शिक्षक ऑनलाईन क्लास घेत होते. त्यावेळी अचानक क्लासच्या स्क्रिनवर पॉर्न व्हिडिओ लागला. व्हिडिओतून अश्लील आवाज येऊ लागले. त्या आवाजांमुळे पालकही हैराण झाले. त्यानंतर मुलांनी पालकांकडे तक्रार केल्यानंतर पालकांनी शाळेकडे याबाबत तक्रार केली.

- Advertisement -

हे प्रकरण शाळेने गंभीरपणे घेतले आहे. ऑनलाईन क्लास सध्या बंद करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हा प्रकाश शाळेची इमेज खराब करण्यासाठी घडवून आणल्याचा संशय शाळेने व्यक्त केला आहे.


हे ही वाचा – भारतीय राखी वापरून साजरा करा रक्षाबंधन, यावर्षी चीनी राखीला ‘नो एन्ट्री’!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -