हिंदू मुलीला कुंकू लावायची परवानगी, मग हिजाबला विरोध का? ओवैसींचा सवाल

Asaduddin Owaisi

मुंबई – जर आपण युनिफॉर्ममध्ये एखाद्या शिख मुलाला पगडीची परवानगी देतो. हिंदू मुलीला कुंकू लावायची आणि मंगळसूत्राची परवानगी देता, पण मुस्लीम मुलींना हिजाबची परवानगी मिळत नसेल तर हा भेदभाव आहे, असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

हिजाब बंदीवरील मुद्द्यावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधिशांचे एकमत न झाल्याने हे प्रकरण आता मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्यात आले आहे. यावरून ओवैसी यांनी आपलं मत मांडलं आहे. ते म्हणाले की, “भाजपने विनाकारणच हा मुद्दा बनवला आहे. खरे तर हा मुलींच्या पसंतीचा मुद्दा आहे. जर आपण युनिफॉर्ममध्ये एखाद्या शिख मुलाला पगडीची परवानगी देता आणि हिंदू मुलीला कुंकू लावायची आणि मंगळसूत्राची परवानगी देता, पण मुस्लीम मुलींना हिजाबची परवानगी मिळत नसेल तर हा भेदभाव आहे. एवढेच नाही, तर जर मुलांनी एकमेकांची धार्मिक परंपरा बघितली नाही, तर ते विविधा कशी समजू शकतील. मुलांना शाळेतच सर्व परंपरा समजायला हव्यात.”

जर एखाद्याला हिजाब परिधान करायचा नसेल तर ती व्यक्ती तसे करू शकते. मात्र, जर कुणाची इच्छा असेल, त्याला परिधान करू द्यायला हवा. मुलींनी हिजाब परिधान करावा, असा आदेश अल्लाहने कुराणात दिला आहे, असेही ओवेसी यावेळी म्हणाले.