देशभरात नुकतीच स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय हिंदू महासभेने दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे भारतीय चलनातील नोटांवर महात्मा गांधींच्या जागी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो छापला जावा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ हा खिताब प्रदान करण्यात यावा.
‘सावरकरांच्या योगदानाचा सन्मान व्हावा’
अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रमुख स्वामी चक्रपाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे या दोन मागण्या सादर केल्या आहेत. ‘भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी खूप कष्ट सोसले, देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून काळ्या पाण्याची शिक्षा भोगली अशा महान स्वातंत्र्यसेनानीचे स्मरण म्हणून नोटेवर त्यांचा फोटो छापण्याची मागणी करत आहोत’, असे चक्रपाणी यांनी सांगितले. तसेच सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातील संपूर्ण योगदान लक्षात घेता त्यांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करावे, अशी आमची इच्छा असल्याचेही ते म्हणाले.
Akhil Bharat Hindu Mahasabha (ABHM) requested Centre to replace photograph of Mahatma Gandhi from the Indian currency with social reformer Veer Savarkar.
Read @ANI story | https://t.co/wAzFmCdg2m pic.twitter.com/UucxroIeed
— ANI Digital (@ani_digital) May 29, 2018