घरताज्या घडामोडीभगवा JNU : जेएनयू जवळ हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी लावले भगवे झेंडे, पोलिसांचा...

भगवा JNU : जेएनयू जवळ हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी लावले भगवे झेंडे, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Subscribe

काही दिवसांपूर्वी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमधील झालेला वाद अद्याप संपलेला नाहीये. त्यानंतर आता जेएनयूच्या बाहेरील रस्त्यावर आणि मुख्य गेटजवळ भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवर भगवा JNU असे लिहिले आहे. हे पोस्टर्स आणि झेंडे हिंदू सेनेने लावल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

हिंदू सेनेने जेएनयूबाहेर पोस्टर्स लावल्यामुळे हिंदू सेनेने उपाध्यक्ष सुरजित यादव यांचे एक वक्तव्यही समोर आले आहे. विरोधकांकडून जेएनयूमध्ये भगव्याचा अपमान केला जातो. असा आरोप त्यांनी केला आहे. भगव्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही तुमचा आदर करतो. तुम्ही देखील प्रत्येक धर्म आणि विचारांचा आदर करा, असं यादव म्हणाले.

- Advertisement -

आज सकाळी जेएनयूजवळील रस्त्यावर आणि आसपासच्या परिसरात काही झेंडे आणि बॅनर लावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. नुकत्याच घडलेल्या घटना लक्षात घेऊन ते तत्काळ हटवण्यात आले असून योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. अशी माहिती दक्षिण पश्चिम दिल्लीच्या डीसीपींनी दिली आहे.

- Advertisement -

रामनवमीच्या दिवशी जेएनयूच्या कावेरी वसतिगृहाच्या मेसमध्ये मांसाहार देण्यावरून दोन विद्यार्थी गटांमध्ये हाणामारी झाली. तेव्हा दोन्ही बाजूचे डझनभर विद्यार्थी जखमी झाले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी वसतिगृहात येऊन मेस कर्मचाऱ्यांना मांसाहार बनण्यापासून रोखले आणि तेथे उपस्थित विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याचा आरोप डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी केला होता. त्याचवेळी, डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी रामनवमीनिमित्त होणारी पूजा थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अभाविपच्या सदस्यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.


हेही वाचा : JNU Violence: जेएनयूचं नाव बदलून वीर सावरकर ठेवण्याची हिंदू महासभेची मागणी, गृहराज्यमंत्र्यांना लिहिलं पत्र


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -