घरदेश-विदेशSpecial Report: संसदेत आता भाजपचंच हिंदुत्व; लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत एकही मुस्लिम खासदार नाही

Special Report: संसदेत आता भाजपचंच हिंदुत्व; लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत एकही मुस्लिम खासदार नाही

Subscribe

नियमांनुसार, ते 6 महिन्यांच्या आत संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य झाले नाहीत, तर त्यांचे मंत्रीपदही जाऊ शकते. त्याचवेळी पक्षाचे प्रवक्ते असलेले सय्यद जफर इस्लाम यांचा कार्यकाळ 4 जुलै रोजी संपत आहे. तसेच एम. जे. अकबर यांचा कार्यकाळ 29 जून रोजी संपुष्टात येत आहे.

नवी दिल्लीः राज्यसभा निवडणुकीवरून राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच आता हिंदुत्वाची कास धरणाऱ्या भाजपनेही मुस्लिम उमेदवारांना डाववल्याचं बोललं जातंय. केंद्रातील मोदींच्या सरकारमध्ये एकमात्र मुस्लिम मंत्री असलेल्या मुख्तार अब्बास नक्वींना पुन्हा राज्यसभेची संधी देण्यात आलेली नाही. तसेच त्यांना आता लोकसभा निवडणुकीत उतरवले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

10 जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा 31 मे हा शेवटचा दिवस होता. त्यावेळी भाजपनं जवळपास 22 उमेदवारांची यादी जाहीरसुद्धा केली. परंतु त्यात मुख्तार अब्बास नक्वी यांचं नाव नव्हतं. नक्वी यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपणार आहे. खरं तर मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासह भाजपमधील सईद जफर इस्लाम आणि एम. जे. अकबर हे तीन सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यानंतर राज्यसभेसारख्या वरिष्ठ सभागृहात भाजपचा एकही मुस्लिम खासदार पाहायला मिळणार नाही. विशेष म्हणजे सध्या लोकसभेतही भाजपचा मुस्लिम प्रतिनिधी नाही.

- Advertisement -

भाजप, काँग्रेससह अन्य पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर केली असली तरी या 22 उमेदवारांच्या यादीत एकाही मुस्लिम चेहऱ्याचा समावेश नाही. त्याचवेळी भाजपकडून राज्यसभेवर आलेल्या मुस्लिम चेहऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. मुख्तार अब्बास नक्वी, सय्यद जफर इस्लाम आणि एमजे अकबर हे भाजपच्या राज्यसभेतील तीन मुस्लिम खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. त्यांचा कार्यकाळ काही दिवसांत संपत असून भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. लोकसभेत भाजपकडून आधीच एकही मुस्लिम खासदार नाही. मुख्तार अब्बास नक्वी सध्या केंद्रात अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आहेत आणि त्यांचा राज्यसभेचा खासदार म्हणून कार्यकाळ 7 जुलै रोजी संपत आहे. नियमांनुसार, ते 6 महिन्यांच्या आत संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य झाले नाहीत, तर त्यांचे मंत्रीपदही जाऊ शकते. त्याचवेळी पक्षाचे प्रवक्ते असलेले सय्यद जफर इस्लाम यांचा कार्यकाळ 4 जुलै रोजी संपत आहे. तसेच एम. जे. अकबर यांचा कार्यकाळ 29 जून रोजी संपुष्टात येत आहे.

नक्वी, सय्यद जफर इस्लाम आणि एमजे अकबर यांचा कार्यकाळ संपणार

मुख्तार अब्बास नक्वी हे उत्तर प्रदेशमधल्या रामपूर लोकसभा जागेवरून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. सपा नेते आझम खान यांच्या राजीनाम्यानंतर इथे पोटनिवडणुकीची घोषणा झालीय. मुख्यार अब्बास नक्वींनी या आधी पूर्व रामपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. 1998 मध्ये पहिल्यांदा रामपूरमधून निवडणूक जिंकून ते लोकसभेत पोहोचले होते आणि वाजपेयी सरकारमध्ये सूचना आणि प्रसारण मंत्री होते. भाजपला यंदा रामपूरची जागा पुन्हा मिळवायची आहे.

- Advertisement -

2020 मध्ये सपा नेते अमर सिंह यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी भाजपने सय्यद जफर इस्लाम यांना उमेदवारी दिली होती. सप्टेंबर 2020 मध्ये ते राज्यसभेवर गेले होते. जफर इस्लाम हे भाजपचे प्रवक्ते असून, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजपमध्ये आणण्यात इस्लाम यांचा मोठा वाटा असल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसभेतही भाजपचा एकही मुस्लिम खासदार नाही

लोकसभेत भाजपचा एकही मुस्लिम खासदार नाही. गेल्या लोकसभा म्हणजेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने काही मुस्लिम चेहरे उभे केले होते, परंतु कोणालाही विजय मिळाला नाही. दुसरीकडे एनडीएचा विचार करता मेहबूब अली कैसर हा बिहारमधील एकमेव मुस्लिम चेहरा आहे, जो एलजेपीच्या तिकिटावर निवडणूक जिंकला आहे. जफर इस्लाम, शाहनवाज हुसेन, एमजे अकबर, मुख्तार अब्बास नक्वी, आरिफ बेग, सिकंदर बख्त आणि नजमा हेपतुल्ला हे मुस्लिम नेते भाजपचे खासदार राहिले आहेत.


हेही वाचाः Ayodhya Ram Mandir : आज अयोध्येत होणार राम मंदिर गाभाऱ्याची पायाभरणी, मुख्यमंत्री योगींच्या हस्ते शुभारंभ

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -