घरदेश-विदेशहीराबेन मोदी अनंतात विलीन, पंतप्रधान मोदींनी दिला मुखाग्नी

हीराबेन मोदी अनंतात विलीन, पंतप्रधान मोदींनी दिला मुखाग्नी

Subscribe

Heeraben Modi Demise | गुरुवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. हीराबेन मोदी यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

Heeraben Modi Demise | अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचं शुक्रवारी पहाटे ३.३० वाजता निधन झाले. गुजरातमधील अहमदाबाद येथील युएन रुग्णालयात त्यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळ आणि आजारापणाने त्यांचं निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. तसंच, त्यांनीच मुखाग्नी देत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

हेही वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे निधन, १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांची प्रकृती खालावली म्हणून २८ डिसेंबर रोजी अहमदाबाद येथील यू.एन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र, गुरुवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. हीराबेन मोदी यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.


आईची तब्येत बिघडल्याचं कळताच मोदी गुजरातमध्ये दाखल झाले होते. तासभर आईच्या प्रकृती चौकशी त्यांनी केली. वृद्धापकाळ आणि आजारपणामुळे त्यांची प्रकृती बिघडली. मात्र, उपाचाराला साथ न मिळाल्याने त्यांचे निधन झाले.

- Advertisement -

हेही वाचा – Heeraben Modi Demise… हीराबेन मोदी यांच्या निधनाबद्दल बड्या नेत्यांकडून श्रद्धांजली

यंदाच्या १८ जून रोजी हीराबेन मोदी यांनी वयाची १०० गाठली होती. त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. वाढदिवसासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः गांधीनगरला गेले होते. आईचे पाय धुवून त्यांनी आशीर्वादही घेतले होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आई हीराबेनबदद्ल विशेष स्नेह होता. हीराबेन गांधीनगरमध्ये मोदींच्या भावाबरोबर राहत होत्या.
मोदी वरचेवर आईला भेटण्यासाठी गुजरातला जात असत. त्यांच्या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर बऱ्याचवेळा व्हायरल होत. गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान मोदी गुजरातला आले होते. त्यावेळीही त्यांनी आईची भेट घेत तिचे आशिर्वाद घेतले होते.

हेही वाचा Heeraben Modi Demise : मुलासोबत फक्त 2 वेळाच व्यासपीठावर दिसल्या होत्या हीराबेन; काय आहे कारण?

हेही वाचा Heeraben Modi Demise : 100 वर्षांचे खडतर आयुष्य आणि 6 मुलांचा सांभाळ

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -