घरअर्थजगतटाटा समूहाकडून ऐतिहासिक डील, २५० विमाने खरेदी करणार

टाटा समूहाकडून ऐतिहासिक डील, २५० विमाने खरेदी करणार

Subscribe

Air India-Airbus Deal | टाटा समूहाने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात एअर इंडिया आपल्या ताब्यात घेतले होते. डबघाईला आलेल्या एअर इंडियाला टाटाने विकत घेतल्याने एअर इंडियाने आता कात टाकली आहे. त्यामुळे टाटा समूहाकडून आता नवनवे प्रयोग केले जात आहेत.

Air India-Airbus Deal | नवी दिल्ली – टाटा समूहाची (Tata Group) मालकी असलेल्या एअर इंडियाने (Air India) २५० विमाने खरेदी करण्याची मोठी घोषणा केली आहे. यामध्ये ४० मोठ्या आकारातील विमाने असणार आहेत. टाटा सन्सचे चेअरमन एन.चंद्रशेखर यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. ए ३५० श्रेणीतील मोठ्या आकाराची ४० विमाने असणार आहेत तर, २१० मध्यम आकाराची विमाने असणार आहेत. टाटा समूहाने आतापर्यंत केलेली ही सर्वांत मोठी आणि ऐतिहासिक डील असणार आहे.

हेही वाचा – विमानात महिलेवर लघुशंकाप्रकरणी आरोपी शंकर मिश्राला जामीन मिळाला

- Advertisement -

Airbus A350 लांब पल्ल्याची, वाइड-बॉडी ट्विन-इंजिन जेट विमान आहे. A350-900 आणि A350-1000 असे विमानाचे दोन श्रेणी आहेत. A350-900 मध्ये 15,000 किमीच्या रेंजसह 300 ते 350 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. तर, A350-1000 मध्ये 350 ते 410 प्रवासी बसू शकतात.

A350 हे असे पहिले एअरबस विमान आहे जे मोठ्या प्रमाणात कार्बन फायबर पॉलिमरपासून बनवण्यात आले आहे. A350-900 या विमानाने पहिल्यांदा व्यावसायिकरित्या १५ जानेवारी २०१५ मध्ये दोहा आणि फ्रॅन्कफर्टच्या दरम्यान उड्डाण केले होते. तर, A350-1000 हे विमान २०१६ मध्ये लॉन्च झाले होते. याचे पहिले उड्डाण २४ नोव्हेंबर २०१६ रोजी झाले होते.

- Advertisement -

टाटा समूहाने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात एअर इंडिया आपल्या ताब्यात घेतले होते. डबघाईला आलेल्या एअर इंडियाला टाटाने विकत घेतल्याने एअर इंडियाने आता कात टाकली आहे. त्यामुळे टाटा समूहाकडून आता नवनवे प्रयोग केले जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलं कौतुक

विमान खरेदी करारामुळे भारताच्या विमान वाहतूक बाजाराला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कराराबाबत आनंद व्यक्त केला आहे. येत्या दीड दशकात भारताला 2,000 हून अधिक विमानांची गरज भासेल, असे ते म्हणाले आहे. या संदर्भात नवीन करार अतिशय महत्त्वाचा आहे. या कराराच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनही उपस्थित होते. हा करार ऐतिहासिक असून यामुळे भारत आणि फ्रान्समधील संबंध, नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील भारताचे यश आणि अपेक्षा प्रतिबिंबित करतो, असं मोदी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -