
कोरोना महामारीत आरोग्य क्षेत्रातून एक ऐतिहासिक कामगिरी समोर आली आहे. अमेरिकेतील डॉक्टरांनी मानवी शरीरात चक्क डुकराचे ह्रदय बसवण्याची एक यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. एका 57 वर्षाच्या व्यक्तीवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मानवी शरीरात डुकराचे ह्रदय प्रत्यारोपण करण्याचा जगातील पहिलाच प्रयोग अमेरिकेत झाला आहे.
अमेरिकन औषध नियामक संस्थेने २०२२ च्या सुरुवातीला या शस्त्रक्रियेसाठी परवानगी दिली होती. त्यानुसार मागील शुक्रवारी डॉक्टरांनी डुकराचे ह्रदय या व्यक्तीच्या शरीरात यशस्वीरित्या प्रत्यारोपण करुन त्याचे प्राण वाचवले. डेव्हिड बेनेट असे हृदय प्रत्यारोपण (Heart Transplant) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील ही ऐतिहासिक कामगिरी मानली जातेय.
अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल स्कूलने सोमवारी या शस्त्रक्रियेसंदर्भात एक निवेदन जारी केले.रुग्ण डेविड बेनेट यांची प्रकृती मानवी ह्रदय प्रत्यारोपणासाठी योग्य नव्हती. मात्र त्याचा जीव वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. ह्रदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तीन दिवसांत डेव्हिड बेनेट यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र शरीरात डुकराचे ह्रदय बसवल्यानंतर ते कसं काम करतंय यावर परिक्षण केलं जातयं.
डेव्हिड बेनेट यांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या बार्टले ग्रिफीथ यांनी सांगितले की, हृदय प्रत्यारोपणाची या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता अवयव दानातील कमतरता भरुन काढण्यास मदत होईल. कारण जगात हृदय दान करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे. मात्र ही शस्त्रक्रिया भविष्यात रूग्णांसाठी महत्वाचा आहे.
बेनेट यांच्या शरीरात प्रत्यारोपित केलेल्या ह्रदयावर अनुंवाशिक संशोधन करण्यात आले होते. या डुकराचे शरीर मानवी शरीरात प्रत्यारोपित करण्यासाठी 10 वेगवेगळ्या प्रकारच्या जिनोममध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान ज्या दिवशी प्रत्यारोपण करायचे होते त्यादिवशी पथकाने डुकराचे हृदय काढले होते. शस्त्रक्रियेपूर्वी हे ह्रदय एका मशीनमध्ये ठेवण्यात आले आहे.
डेव्हिडने शस्त्रक्रियेच्या एक दिवस आधी आपल्यासमोर मृत्यू किंवा प्रत्यारोपण यापैकी एकचं मार्ग असल्याचे सांगितले होते. दरम्यान प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली तर जगण्याची आशा आहे. कारण जगण्यासाठी माझ्याकडे हा शेवटचा पर्याय होता. गेल्या अनेक काळ डेव्हिड हार्ट-लंग बायपास मशिनच्या मदतीने जगतोय. मात्र या शस्त्रक्रियेमुळे तो उभा राहिल अशी डेव्हिडला आशा आहे.