गुलामगिरीच्या काळात रचलेला इतिहास स्वातंत्र्यानंतरही शिकवला, नरेंद्र मोदींची टीका

या समारंभाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'गुलामगिरीच्या काळात रचलेला इतिहास स्वातंत्र्यानंतरही तोच शिकवला गेला. स्वातंत्र्यानंतर गुलामगिरीचा अजेंडा बदलण्याची गरज होती पण तसे झाले नाही.'

narendra modi

नवी दिल्ली – ईशान्येतून मुघल सैन्याचा पाठलाग करणारे अहोम साम्राज्याचे सेनापती लचित बोरफुकन यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त उत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला. जेव्हा देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे, अशा वेळी लचित बोरफुकनची 400 वी जयंती साजरी करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. हा ऐतिहासिक प्रसंग आसामच्या इतिहासातील एक अभिमानास्पद अध्याय आहे, असं येथील जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

या समारंभाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘गुलामगिरीच्या काळात रचलेला इतिहास स्वातंत्र्यानंतरही तोच शिकवला गेला. स्वातंत्र्यानंतर गुलामगिरीचा अजेंडा बदलण्याची गरज होती पण तसे झाले नाही.’

गुलामगिरीची मानसिकता सोडून देशाचा आपल्याला अभिमान आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आज भारत केवळ सांस्कृतिक वैविध्य साजरे करत नाही तर आपल्या संस्कृतीतील ऐतिहासिक वीरांचे अभिमानाने स्मरण करत आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, लचित बारफुकनसारख्या महान व्यक्ती आणि भारतमातेची अमर हुतात्मे हे या अमरयुगातील संकल्प पूर्ण करण्यासाठी आमच्या प्रेरणा आहेत.

हेही वाचा – अल कायदाने भारतात उभारले जिहादचे नवे मॉड्यूल; तपास यंत्रणांकडून अलर्ट जारी

दिल्लीच्या विज्ञान भवनात सुरू असलेल्या सोहळ्याचे उद्घाटन आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या हस्ते झाले. या उत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या प्रदर्शनाला सरमा यांच्यासह पंतप्रधान मोदींनीही भेट दिली. यानंतर पंतप्रधानांनीही लचित यांच्या चित्राला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाला राज्यपाल जगदीश मुखी, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि इतरांव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा उपस्थित होते.